Goa Crime Case: सारा खान ड्रग्स प्रकरणात सहकाऱ्याचीही होणार चौकशी

Goa Crime Case: कळंगुट पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिस सध्या पेडलरचा शोध घेत आहेत.
Goa Crime Case
Goa Crime CaseDainik Gomantak

Goa Crime Case: दिल्लीस्थित सारा खान यांच्यावर मंगळवारी हणजुणेच्या नाईट क्लबमध्ये मादक पदार्थ सेवन केल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांत रितसर गुन्हा दाखल झाला असून कळंगुट पोलिस सध्या त्यांना ड्रग्स पुरविणाऱ्या पेडलरचा शोध घेत आहेत.

दरम्यान, सारा खान यांच्यासोबत सोमवारी गोव्यात कळंगुट येथे दाखल झालेल्या सहकारी डॉक्टर मित्राचीही या प्रकरणात कसून चौकशी होणार आहे. मादक पदार्थांचे अतिसेवन केल्याचा गुन्हा असलेल्या सारा खान सध्या दोनापावल येथील एका खासगी इस्पितळाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

दिल्लीस्थित सारा खान आपल्या एका पुरुष सहकारी मित्रासमवेत सोमवारी कळंगुटात आल्या होत्या. त्यांच्यावर मादक पदार्थांचे अतिसेवन केल्याचा आरोप असून सध्या त्या पणजी-दोनापावल येथील एका खासगी इस्पितळात उपचार घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी पोलिस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. कळंगुटमध्ये ड्रग्स पेडलर्सविरोधात विशेष मोहीम राबविण्याची आवश्‍यकता नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Goa Crime Case
Goa Crime News: गोव्यात ड्रग्सचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर; ओव्हरडोसमुळे महिलेची प्रकृती बिघडली

हा घ्या पुरावा...

  • यापूर्वी पुदूचेरी येथील दोन पर्यटक तरुण कळंगुट येथे उतरले होते. ते रात्रीच्या संगीत रजनीला गेलेले. त्यातील एकाची ड्रग्स सेवनाने प्रकृती बिघडली. मात्र, इस्पितळात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्‍यू झाला होता.

  • हणजूण येथे कर्लिस बीच शॅक रेस्‍टॉरंटमध्ये अभिनेत्री सोनाली फोगाट यांचाही अतिप्रमाणात ड्रग्स सेवनाने मृत्यू झाला होता. हे ड्रग्स त्या सहकाऱ्यांसमवेत राहात होत्या, त्या हॉटेलमधील रूमबॉयनेच उपलब्ध केला होता.

  • हैदराबाद येथून आलेल्या तीन अभियंत्यांना एका टॅक्सीचालकानेच ड्रग्स उपलब्ध करून दिले होते. दाबोळी विमानतळावरून हा टॅक्सीचालक त्यांना कळंगुट येथे घेऊन गेला होता.

चौकशीस मंजुरी नाही

कळंगुट पोलिस पथकाकडून तत्काळ कारवाई करताना दोनापावल येथील त्या इस्पितळाला भेट देत संशयित सारा खान यांची चौकशी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तेथील डॉक्टरांनी त्या बेशुद्धावस्थेत असल्याने त्यांची चौकशी करण्याची मंजुरी दिली नाही, असे निरीक्षक सावंत यांनी यावेळी सांगितले.

Goa Crime Case
Goa Government: चिरे अन् वाळू उत्खननास परवानगी; तर कॅसिनोंना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ

एनसीबीची स्वतंत्र शाखा आवश्‍यक

गोव्यात आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील. गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने तसेच देश विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने गोव्यातील ड्रग्स व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे स्वतंत्र (एनसीबी) कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती एनसीबीचे विभागीय अधिकारी अमित घावटे यांनी दिली.

दत्तगुरू सावंत, पोलिस निरीक्षक-

सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणानंतर सारा खान ड्रग्स प्रकरण सध्या गोव्यात गाजत आहे. कळंगुट व परिसराला भेट देणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा तसेच त्यांचे हितरक्षण करण्याची जबाबदारी कळंगुट पोलिसांकडून उचलण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com