Goa Crime: दीपाली मेथा खूनप्रकरण; प्रियकराला जन्मठेप

आरोपीला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला
Goa Crime: दीपाली मेथा खूनप्रकरण; प्रियकराला जन्मठेप
Goa Crime | Deepali Metha murder case | life convict to lover Dainik Gomantak

मडगाव: प्रेमप्रकरणात वितुष्ट आल्याने आपली प्रेयसी दीपाली मेथा या 20 वर्षीय युवतीचा गळा आवळून खून केल्याचा विजयेंद्र ऊर्फ चेतन आरोंदेकर याच्या विरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय आरोपीला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून, हा दंड न भरल्यास आणखी दोन वर्षे अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.

ज्या विश्‍वासाने दीपाली आपल्या प्रियकराबरोबर आली त्याच विश्वासाचा आरोपीने गळा घोटल्याने तो दयेस पात्र होऊ शकत नाही, असे न्या. डिसिल्वा यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. दीपाली ही तळपण-काणकोण येथील रहिवासी होती. डिसेंबर 2016 च्या दरम्यान ही खुनाची घटना घडली होती. संशयिताने तिला आपल्या दुचाकीवरून काब द राम येथे आणून नंतर तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह तिथेच टाकून तो निघून गेला.

Goa Crime | Deepali Metha murder case | life convict to lover
मडगाव नगरपालिकेची मॉन्सूनपूर्व कामे रेंगाळली

दरम्यान, दीपाली घरी आली नाही म्हणून तिच्या घरच्यांनी काणकोण पोलिसात तक्रार दिली होती. मागाहून तिचा मृतदेह काब द राम परिसरात आढळून आला. ही जागा कुंकळ्ळी पोलिस स्थानकाच्या हद्दीत येत असल्याने कुंकळ्ळी पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले असता त्याने खुनाची कबुली दिली.

याप्रकरणी पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांनी तपास केला. एकूण 32 साक्षीदार न्यायालयात सादर करून संशयिताविरोधातील गुन्हा सिद्ध करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.