Goa Crime News : निर्दयतेचा कळस! घरमालकाकडे तक्रार केल्यानेच बापाने केला मुलीचा खून!

पोलिस तपासात सलीमने दिली कबुली
Goa Crime News
Goa Crime News Dainik Gomantak

पणजी : ज्युलिया ही घरमालकाकडे आपली तक्रार करायची, तसेच दिवस-रात्र ती त्यांच्याच घरात असायची, याचा नराधम वडील महम्मद सलीम खातून याला राग व संशयही होता. काही दिवसांपूर्वी सलीमने पत्नीला मारहाण केल्याचे ज्युलियाने घरमालकाला सांगितल्यावर त्यांनी सलीमची कानउघाडणी केली होती. त्यामुळे आपली मुलगी ज्युलियाबद्दलचा राग सलीमच्या मनात धगधगत होता. त्यातूनच त्याने स्वत:च्या मुलीला संपवण्याचे भयंकर क्रौर्य केले.

Goa Crime News
Water Issues in Goa : भाटी पंचायत क्षेत्रात पाचव्या दिवशीही पाणी नाही!

संशयित सलीमला न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी बजावली आहे. संशयित सलीम हा बांधकाम मजूर होता. रात्री घरी परतल्यावर तो पत्नीशी भांडायचा. अनेकदा तिला मारहाणही करायचा. वडिलांकडून होणाऱ्या अत्याचाराची माहिती ज्युलिया घरमालकाला सांगायची. ती अधिक वेळ घरमालकाकडेच असायची. घरमालकही तिचीच बाजू घेऊन सलीमला अनेकदा ओरडायचा. त्याचा सलीमला प्रचंड राग होता.

ती समोर दिसल्यावर त्याला संताप यायचा. तिचा काटा काढण्याची संधीच तो शोधत होता. त्या मंगळवारी रात्री त्याने घरात भांडण सुरू केल्यानंतर पत्नी मुलांना घेऊन घराबाहेर पडली, पण ज्युलिया तिच्यासोबत गेली नाही. पत्नी मुलांना घेऊन घरातून निघून गेल्यावर ज्युलिया एकटीच असल्याची संधी साधून सलीमने तिचा काटा काढला, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. सलीमने पोटच्या मुलीचा खून केल्याचे जराही दुःख त्याच्या चेहऱ्यावर नव्हते. ज्युलियामुळे घरमालकाकडून मारझोड झाल्याचा बदला घेतल्याचे त्याने चौकशीत सांगितले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मृत्यूनंतरही क्रूर व्यवहार

पत्नीचा शोध घेण्याचा बहाणा करत रात्री सलीमने ज्युलियाला सोबत नेले. शेतामध्ये तिच्याच दुपट्ट्याने गळा आवळून तिचा खून केला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह त्याने चोडण मानशीलगतच्या खारफुटीच्या दलदलीत टाकला. मृतदेह वाहून जाऊन पितळ उघडे पडू येऊ नये म्हणून त्याने तिचे दोन्ही हात दोरीने बांधले व तिला खारफुटीच्या झाडाला बांधले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com