गोम्सच्या मृत्यूला ‘पाखलो’ दोषी

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध : शिक्षेवरील निवाडा 27 रोजी
Goa Crime News गोम्सच्या मृत्यूला; ‘पाखलो’ दोषी
Goa Crime News गोम्सच्या मृत्यूला; ‘पाखलो’ दोषीDainik Gomantak

पणजी: सांतइस्तेव येथील आग्नेलो सांतान गोम्स (59 वर्षे) याच्या मृत्यूप्रकरणी पणजी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी अँथनी झेव्हियर ज्युलियन व्हिएगश ऊर्फ पाखलो ऊर्फ ज्युलिओ याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले. त्याच्या शिक्षेवरील निवाडा 27 ऑक्‍टोबरला ठेवण्यात आला आहे. आरोपीने चारचाकीने पाठलाग करून दुचाकीने जाणाऱ्या आग्नेलो याला ठोकर दिली होती व त्या अपघातात याचा मृत्यू झाला होता.

Goa Crime News गोम्सच्या मृत्यूला; ‘पाखलो’ दोषी
तंबाखू निर्मूलनासंबंधी होणार जनजागृती

या घटनेप्रकरणी आरोपी पाखलो याच्याविरुद्ध दाखल केलेला खुनाचा गुन्हा सिद्ध होत नाही. मात्र, आग्नेलो गोम्स याच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. या खटल्यावेळी सादर केलेल्या साक्षीदारांच्या जबानीतून मृत्यूला तोच जबाबदार असल्याचे सिद्ध होत असल्याने न्यायालयाने म्हटले आहे.

वाहनाला पाठलाग करून ठोकरले

सांतइस्तेव एका शॅकमध्ये आग्नेलो गोम्स व अँथनी व्हिएगश यांच्यात 9 नोव्हेंबर2012 मध्ये रात्री 9.45 वा.च्या सुमारास बाचाबाची झाली होती. त्यावेळी गोम्स याला पाखलो याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणानंतर आग्नेलो या शॅकमधून निघून दुचाकीने घरी जाण्यास निघाला होता. त्याचवेळी आरोपी पाखलो याने चारचाकीने त्याचा पाठलाग केला. सांतइस्तेव येथील पाल्मारवाडा येथे पोहोचला असता चारचाकीने दुचाकीला ठोकर दिली. या ठोकरमुळे दुचाकीवरील अँथनी पडून त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी इस्पितळात नेत असताना त्याचे वाटेतच निधन झाले होते.

Goa Crime News गोम्सच्या मृत्यूला; ‘पाखलो’ दोषी
...अखेर वास्‍कोतील वादावर तात्‍पुरता पडदा

दोषीला 24 तासांत अटक

याप्रकरणाचा गुन्हा जुने गोवे पोलिस स्थानकाचे तत्कालिन पोलिस निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांनी नोंदवून आरोपी पाखलो याला दुसऱ्या दिवशी 24 तासांत अटक केली होती. त्याच्याविरुद्ध कलम 302 खाली खुनाच्या आरोपाखाली आरोपपत्र सादर करण्यात आले होते.

वकिलांचा युक्तिवाद आणि न्‍यायालय...

या खटल्यावरील सुनावणीवेळी पोलिसांनी शॅकमध्ये मयत अँथनी व आरोपी पाखलो यांच्यात झालेली बाचाबाचीवेळी उपस्थित असलेले शॅकचे मालक व कर्मचारी हे साक्षीदार सादर केले होते. ही घटना होण्यापूर्वी आरोपी पाखलो याला मारहाणीप्रकरणी न्यायालयाने 23 ऑगस्ट 2011 रोजी एक महिन्याची कैदेची शिक्षा सुनावली होती, ही माहिती सुनावणीवेळी देण्यात आली होती. दोषी व्‍यक्तीची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची असल्याची बाजू न्यायालयात मांडण्यात आली होती. दुचाकीवरील अँथनी याला ठोकर दिल्यास तो जखमी होऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो, हे आरोपीला माहीत होते. जखमी करण्याचा दोषीचा त्यामागील हेतू नव्हता. त्यामुळे त्याला खुनाच्या आरोपाखाली दोषी धरण्यात यावे, अशी बाजू सरकारी वकिलांनी मांडली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com