Goa Crime: युवतीला ढकलल्या प्रकरणी फोंड्यातील युवकाला अटक

संशयिताला अटक करण्यात पोलिसांचा वेळकाढूपणा, शेवटी कपिलेश्‍वरी - कवळे येथील नागरिकांचा पोलिस स्थानकावर मोर्चा (Goa Crime)
Goa Crime: युवतीला ढकलल्या प्रकरणी फोंड्यातील युवकाला अटक
कपिलेश्‍वरी - कवळे येथील पोलिस स्थानकावर नेलेल्या मोर्चातील नागरिक (Goa Crime)Dainik Gomantak

Goa Crime: फोंडा, कपिलेश्‍वरी - कवळे येथील एका युवतीला ढकलून तिला जखमी केल्याप्रकरणी वारभाट - कवळे येथील संशयित ओंकार धनंजय कवळेकर याला अखेर आज (शनिवारी) पोलिसांनी दुपारी ताब्यात घेतले (Police arrested the suspect). त्याला फोंडा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर (Ponda First Class Magistrate) उभे केले असता तीन दिवसांचा रिमांड (3 Day Remand) देण्यात आला. संशयित ओंकार याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका युवतीला लिफ्ट देण्यासाठी गाडी थांबवली असता या युवतीने नकार दिल्याने तिला ढकलून खाली पाडले होते, या प्रसंगात युवती जखमी झाल्याने तिच्यावर इस्पितळात उपचार करण्यात आले.

 कपिलेश्‍वरी - कवळे येथील पोलिस स्थानकावर नेलेल्या मोर्चातील नागरिक (Goa Crime)
Goa: पत्नीकडून पतीच्या प्रेमसंबंधाचा पर्दाफाश

दरम्यान, संशयित युवकाला अटक करण्यात पोलिस चाल-ढकल करीत (Ponda Police Delay to Arrest) असल्याने शेवटी कपिलेश्‍वरी - कवळे येथील नागरिकांनी फोंडा पोलिस स्थानकावर मोर्चा नेला (Citizens march at Ponda police station). मात्र फोंडा पोलिसांनी संशयिताला आधीच अटक केल्याचे समजल्याने या नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आणि संशयितावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

 कपिलेश्‍वरी - कवळे येथील पोलिस स्थानकावर नेलेल्या मोर्चातील नागरिक (Goa Crime)
Goa Politics: गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याने सरकार बरखास्त करा - दिगंबर कामत

संशयिताला मोकळा सोडल्यास अन्य घटना घडू शकतात, त्यामुळे पोलिसांनी संशयितावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक पंचसदस्य द्रूपदा नाईक, दीपश्री नाईक व सर्वेश नाईक तसेच इतरांनी केली. पोलिस निरीक्षक मोहन गावडे यांनी संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Related Stories

No stories found.