Goa Crime: तरुणीच्या खून प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता

तीन आठवडे उलटून गेले तरी 'त्या' तरुणीचा (young lady) मृत्यू हा आत्महत्या की हत्या याबाबत पोलीस अजूनही निष्कर्ष काढू शकलेले नाहीत.
Goa Crime: तरुणीच्या खून प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता
तरुणीच्या खुनप्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यताDainik Gomantak

पणजी: नास्नोळा - हळदोणे येथील तरुणीच्या (young lady) मृत्यूसंदर्भात राज्यात खळबळ माजल्यानंतर तिच्या वडिलांनी कळंगुट पोलीस (Calangute Police) स्थानकात खुनाची तक्रार (Murder report) दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. या तक्रारीसंदर्भात पोलीस अधिक्षक शोबित सक्सेना (Superintendent of Police Shobit Saxena) यांनी तातडीची पोलिस उपअधिक्षक एडविन कुलासो व कळंगुटचे पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ (Police Inspector Nolasco Rapoz) यांची बैठक बोलावली आहे.

तरुणीच्या खुनप्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता
Goa Monsoon Updates: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बरसणार

पोलिसांनी काही दिवसांपूर्वी तरुणीचा शव चिकित्सा अहवाल तिच्या कुटुंबियाला दिला आहे. या अहवालातील त्रुटी तसेच संशय व्यक्त करून तिच्या वडिलांनी कळंगुट पोलिसांत सिद्धी हिने आत्महत्या केली नसून तर खून झाल्याचा संशय व्यक्त करून ही तक्रार दिली आहे. त्यांच्या या तक्रारीमुळे गेले काही दिवस थंडावलेले तपासकाम पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीही पोलिसांनी सर्व बाजूने या मृत्यूचा तपास केला होता मात्र त्यात काही पुरावे न सापडले नव्हते. त्यानंतर पोलिसांनी तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे का या दिशेने तपास सुरू करून तिच्या कुटुंबियांच्या तसेच तिच्याशी ओळख असलेल्या काही मित्रमंडळींची जबानीही नोंद केली होती.

तरुणीच्या खुनप्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता
Goa Crime: तरुणीच्या गुढ मृत्यूचा गुंता वाढला

तीन आठवडे उलटून गेले तरी तरुणीचा मृत्यू हा आत्महत्या की हत्या याबाबत पोलीस अजूनही निष्कर्ष काढू शकलेले नाहीत. शव चिकित्सेनंतर डॉक्टरांनी व्हिसेरा न ठेवल्याने यावरून बिगर सरकारी संस्था तसेच विरोधकांनी आक्रमक होऊन पोलीस यंत्रणा तसेच डॉक्टरांच्या निष्काळजीपणाबद्दल आरोप केले होते. तिचा मृतदेह अर्धनग्न स्थितीत सापडला असताना पोलिसांना किंवा डॉक्टरांना संशय का आला नाही असे प्रश्‍न उपस्थित झाले होते. डॉक्टरांनी तिचा मृत्यू बुडून झाल्याचा शव चिकित्सा अहवाल दिला व तिच्या वडिलांनीही दिलेल्या जबानीच्या आधारावर पोलिसांनी कोणताही संशय न घेता मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटंबियांकडे दिला. पोलिसांनी केलेल्या या घाईगडबडीमुळेही पोलिसांच्या या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला होता. तीच्या अंगावर पँटी वगळता इतर कोणतेच कपडे नव्हते. ते कपडे शोधण्यासाठी पोलिसांची पथके किनारपट्टी भागात तैनात करण्यात आली मात्र त्यात पोलिसांना यश आलेले नाही.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com