Goa: गणपती विसर्जनास दामोदर तळीवर गर्दी

गोवा फॉरवर्ड पक्षाच्या (Goa Forward Party)कार्यकर्त्यांनी गणेश विसर्जनावेळी मोठी मदत केली. त्यामुळे नागरिकांचा बराच त्रास कमी झाले.
Goa: गणपती विसर्जनास दामोदर तळीवर गर्दी
दामोदर तळीवर गणपती विसर्जनास आलेल्या लोकांना मदत करताना गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्यकर्ते.Dainik Gomantak

फातोर्डा: मडगाव(Madgaon) येथील नेहरु स्टेडियम समोर असलेली दामोदर तळी ही गणपती विसर्जनास प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन येथे शेकडो नागरीक गणपती विसर्जन करतात. 

पुर्वी प्रत्येकाच्या घरा मागे विहिरी असायच्या आणि याच विहिरीत गणपती विसर्जन होत असे. लोकसंख्याही जेमतेम होती. पण आता जेथे एक घर होते तेथे विहीरी मुजवून मोठ्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. गोव्याबाहेरील (Goa)लोकही येथे राहतात व जे कोण गणपती पुजतात त्याना विसर्जनास जागा उपलब्ध नाही. अशा नागरिकांनी आता आपला मोर्चा दामोदर तळीकडे वळविला आहे.

दामोदर तळीवर गणपती विसर्जनास आलेल्या लोकांना मदत करताना गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्यकर्ते.
Goa Politics: फातोर्डा मतदारसंघात कॉंग्रेसला खिंडार

यंदा कोरोना (covid 19)महामारीमुळे जास्तित जास्त लोकांनी केवळ दीड दिवसच गणेशाचे पुजन केले. त्यामुळे शनिवारी रात्री दामोदर तळीवर मोठी गर्दी उसळल्याचे पहावयास मिळाले.

फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गणेश विसर्जनावेळी मोठी मदत केली. त्यामुळे नागरिकांचा बराच त्रास कमी झाले.

2017 साली आमदार सरदेसाई यांनी या तळीचे महत्व ओळखुन ती सुशोभीत केली, पाण्यामध्ये उतरण्यास पायऱ्या दुरुस्त केल्या, पाण्यामधील पाचोळा काढुन तळी स्वच्छ केली, त्यामुळे आता लोकांचीही त्यांची चांगलीच सोय झाली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com