Goa: पोलिसांनी समज देऊनही गर्दी कायम

कामाच्या प्रतीक्षेत: डिचोली बसस्थानकासमोर मजुरांचा जमाव
Goa: पोलिसांनी समज देऊनही गर्दी कायम
Bicholim bus stand Dainik Gomantak

डिचोली: शहरातील बसस्थानकाजवळील मजुरांची संख्या कमी झाली असली, तरी समस्या मात्र कायम आहे. शहरातील पर्यायी बसथांब्यावरील संभाव्य धोका टाळण्यासाठी बसस्थानकाबाहेर रस्त्यावर गर्दी करणाऱ्या मजुरांविरोधात 29 एप्रिल रोजी पोलिसांनी मोहीम हाती घेत बसस्थानकाजवळ उभ्या राहणाऱ्या मजुरांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज दिली होती. परंतु पुन्हा या ठिकाणी मजूर गर्दी करीत आहेत.

सध्याचा पर्यायी बसथांबा भर रस्त्याला टेकून करण्यात आला आहे. मजुरांच्या गर्दीमुळे प्रवासी बसगाड्या आतबाहेर घेताना एखादेवेळी मोठा अनर्थ घडण्याची भीती आहे. त्यामुळे या मजुरांना तेथून कायमचे हुसकावून लावावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.