गोवा: रेल्वे स्थानकबाहेर मंजुरांची तोबा गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा

Goa Crowd of sanctioned people outside the railway station The fuss of social distance
Goa Crowd of sanctioned people outside the railway station The fuss of social distance

दाबोळी: कोरोना महामारीचा वाढता उद्रेक तसेच लॉकडाऊनच्या (Lockdown) पार्श्वभूमीवर काम गमावलेल्या परप्रांतीय मजूर गोवा (Goa) सोडून जाण्याचे सत्र अवलंबिले असून आज बुधवारी वास्कोतून (Vasco) पटना एक्सप्रेसमधून (Patana Express) हजारो मजूर आपला पसारा घेऊन गावी रवाना झाले. सामाजिक अंतराचे उल्लंघन करून मजुरांनी रेल्वे स्थानकाबाहेर (Railay Station) गर्दी केली होती. (Goa Crowd of sanctioned people outside the railway station The fuss of social distance)

राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा (Corona Second Wave) वाढता उद्रेक त्यामुळे साडेतीन दिवसाचा लॉकडाऊन लादण्यात आला होता. तसेच अजून राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येची साखळी मोडून काढण्यासाठी कोरोना निर्बंध येत्या 10 मेपर्यंत सकाळी 7 पर्यंत वाढवण्यात आला आहे. कोरोना निर्बंधाची कडक कारवाई करण्याचे फर्मान पोलिसांना देण्यात आल्याने मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या लोकांनाही हे निर्बंध लागू आहेत. त्यामुळे कित्येक जणांवर उपासमारीची वेळ उद्भवल्याने मजुरांनी आपल्या घरचा रस्ता धरला आहे. गेल्या शनिवारी 1 मे रोजी कामगार दिनी शेकडो मजूर गोवा एक्सप्रेसमधून (Goa Express) तर तत्पूर्वी बुधवारी दीड हजारांहून अधिक मजूर लोक गावी परतले होते. खासकरून बिहार (Bihar), उत्तर प्रदेश (Uttarpradesh), झारखंड या राज्यातील मजूर लोकांचा अधिक भरणा आहे. मागील वर्षी मजुरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. तेव्हाही शेकडो मजुरांनी घरचा रस्ता धरला होता.

दरम्यान, कोविडचा वाढता प्रादुर्भाव तसेच वाढणारा उद्रेक यामुळे स्थिती दिवसेंदिवस नियंत्रणाबाहेर जात आहे. रुग्णांची वाढती संख्या तसेच कोविड बळींच्या संख्येत होत असलेली वाढ यामुळे लोकांत भीती पसरली आहे. परप्रांतीय मजुरांवर मोलमजुरीचा प्रश्‍न उद्भवला आहे. त्यामुळे मजुरांनी आपल्या गावचा रस्ता धरला आहे. आपल्या गावी जाण्यासाठी मजूर लोकांनी सकाळपासून वास्को रेल्वे स्थानकावर आपले बस्तान ठोकले होते. त्यामुळे वास्को रेल्वे स्थानकाला जत्रेचे स्वरूप आले होते. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड तसेच इतर राज्यातील मजूर लोक आपले अंथरूण-पांघरूण, मुलाबाळांना घेऊन रेल्वेस्थानकावर जमले होते. सामाजिक अंतराचा फज्जा उडवून लोक रांगेत उभे होते. संध्या. 7 वा. सुटणाऱ्या पटना एक्सप्रेस रेल्वेमधून जाण्यासाठी जमलेल्या या मजुरांना संध्या. 5 वा. पोलिस बंदोबस्तात रेल्वे स्थानकात सोडण्यात आले. आजही दीड हजारांहून अधिक मजूर गावी रवाना झाले.वास्को रेल्वे स्थानकावर मजुरांची झुंबड कोविडच्या धास्तीने पटना एक्स्प्रेसमधून हजारो मजुरांचा परतीचा प्रवास

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com