प्रथांच्या प्रदर्शनाने गोव्याच्या सांस्कृतिक पर्यटनाला वाव : पर्यटनमंत्री

आज मडगावचा शिगमोत्सव; ‘रामजन्मभूमी प्रवेशद्वार’ खास आकर्षण
Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak

शिगमोत्सवात गोव्याची सांस्कृती व प्रथांचे प्रदर्शन केले जाते. या प्रदर्शनामुळे गोव्यात सांस्कृतिक पर्यटनाला वाव मिळतो, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. आज मडगाव शिगमोत्सवाच्या तयारीची पाहणी केल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते.

गोव्यात सांस्कृतिक पर्यटन वाढविण्यासाठी युवकांना प्राधान्य देण्याचे काम सरकार करते. येथे सर्व प्रकारचे उत्सव साजरे करणे गरजेचे आहे. यंदा शिगमोत्सवासाठी नगरपालिकांना 17 लाख व ग्रामीण भागांना 11 लाख रुपये दिले आहेत.

Rohan Khaunte
Prashasan Tumchya Daari : लोकांपर्यंत योजना पोहोचवण्यात यश; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पुढील वर्षी या रकमेत वाढ केली जाईल, अशी घोषणा पर्यटनमंत्र्यांनी केली. नगरपालिका चौकात त्यांनी शिगमोत्सवाच्या तयारीची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. त्यांनी मडगाव शिगमोत्सव समिती व नगरपालिकेचे अभिनंदन केले.

मडगावात ‘रामजन्मभूमी प्रवेशद्वार’ देखावा केला जाणार आहे. त्यामुळे या उत्सवात चैतन्य निर्माण होईल, असे ते म्हणाले. शिगमोत्सवात काणकोण ते पेडणे येथील वेगवेगळ्या संस्कृतींचे प्रदर्शन एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मिळते, असे माजी आमदार दामू नाईक यांनी सांगितले.

Rohan Khaunte
Shrigao : शिरगावात लोकवस्तीजवळच खनिज डंपमधून एकाएकी आगीच्या ज्वाळा!

पोलिसांवर ताण

मडगाव नगरपालिका इमारतीच्या समोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूने बसण्यासाठी खास गॅलरी तयार करण्यात आली आहे. उद्या आयएसएल स्पर्धेचा अंतिम सामनाही होणार आहे. त्यामुळे पोलिसांवर वाहतूक व्यवस्था व सुरक्षा व्यवस्था हाताळण्याचे मोठे आव्हान असेल.

"दुपारी 3 वाजता फेन्सी ड्रेस स्पर्धेला सुरवात होणार आहे. रोमटामेळ मिरवणुकीला 4 वाजता सुरवात होईल, त्यानंतर चित्ररथ मिरवणूक होईल. रात्री दहा वाजेपर्यंत जे चित्ररथ येतील त्यांचेच परीक्षण केले जाईल."

- दामोदर शिरोडकर, नगराध्यक्ष, मडगाव पालिका

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com