Shigmo Parade : कुडचडेत आता 13 मार्च रोजी शिगमोत्सव मिरवणूक

कुडचडे येथे शिगमोत्सव मिरवणुकीच्या तारखेत घोळ झाला होता त्यावर तोडगा निघाला असून आता कुडचडे येथे दिं. 13 रोजी शिगमोत्सव मिरवणूक होणार असल्याचे नगराध्यक्षा जसमीन ब्रागांझा यांनी सांगितले.
Shigmo Festival Goa | Shigmo Parade
Shigmo Festival Goa | Shigmo ParadeDainik Gomantak

Shigmo Parade in Goa : कुडचडे येथे शिगमोत्सव मिरवणुकीच्या तारखेत घोळ झाला होता त्यावर तोडगा निघाला असून आता कुडचडे येथे दिं. 13 रोजी शिगमोत्सव मिरवणूक होणार असल्याचे नगराध्यक्षा जसमीन ब्रागांझा यांनी सांगितले. पूर्वी या मिरवणुकीसाठी 16 मार्च ही तारीख ठरली होती. आणि केपेची मिरवणूकही त्याच दिवशी होणार होती.

Shigmo Festival Goa | Shigmo Parade
Leopard Death : शिरवई केपेत आणखी एका बिबट्याचा फासात अडकून मृत्यू

मंगळवार दिं.7 रोजी शिगमो समितीचे अध्यक्ष आमदार नीलेश काब्राल यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिगमोत्सव मिरवणुकीची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले होते.

दरवर्षी शिग्मोत्सवानिमित चार दिवस कार्यक्रम आयोजित केले जात होते पण मध्येच कोविड महामारी आल्याने यावर बंदी आली होती व आता परिस्थिती काही प्रमाणात पूर्वपदावर येत असल्याने सदर कार्यक्रम कमी करण्यात आले असून दिं.13 रोजी शिगमोत्सव मिरवणूक व दिं.14 रोजी रात्री ऑर्केस्ट्रा सादर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कुडचडे शिगमोत्सवाच्या अयोजना निमित्त विविध समित्या स्थापन केल्या असून सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आयोजन समितीतर्फे कळविण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com