Goa Shigmotsav : गोव्यात शिगमोत्सव का साजरा केला जातो? इथे घ्या जाणून

शिगमोत्सवाची तयारी सध्या गोव्यात सुरू आहे.
Goa Shigmotsav
Goa ShigmotsavDainik Gomantak

नम्रता देसाई

Goa Shigmotsav : शिगमोत्सवाची तयारी सध्या गोव्यात सुरू आहे. मराठी महिन्यातील शेवटचा महिना फाल्गुन हा शेतकरी वर्गासाठी महत्त्वाचा मानला जातो. फाल्गुन महिन्यात मध्यात पाऊस पडतो. रब्बी हंगाम समाप्ती होताना आणि खरीप हंगामाच्या आधी शेतकरी ग्रामदेवतेचा उत्सव साजरा करून फाती वाहतात.

ऑर्किड वाहून आणि वेगवेगळ्या वन्यफुलांची आरास करून पुजा केली जाते. ग्रामदेवी पुजा होण्यापूर्वी शेतकरी संध्याकाळी सुर्यास्तावेळी गावातून विविध वेशात मांड (स्टेज) साकारून पौराणिक कथा सादर केल्या जातात. संध्याफेरी आयोजित करताना विविध देखावे सादर केले जातात.

Goa Shigmotsav
'कृष्णसागर मृगा'चे महत्व

गोव्यात शिगमोत्सव का साजरा केला जातो?

गोव्यातील साधारण 16 टक्के रहिवासी शेतकरी आहेत. शेती आधारित व्यवसाय, जोडधंदे करणारे 9 टक्के रहिवासी आहेत. मच्छीमार समाज मोठ्या संख्येने आहे. तंत्रज्ञान घरोघरी पोहोचण्याआधी ग्राम देवतेच्या मंदिरात मांड बांधकाम केलेली असायची.

तिथेच कार्यक्रम आयोजित केले जायचे. रब्बी हंगामात घेतलेल्या कष्टानंतर थोडा विरंगुळा यातून मिळायचा. तंत्रज्ञान घरोघरी पोहोचल्यावर गावात ट्रॅक्टर वापरून आणि छोटा हत्ती, ट्रक, ट्रॉली वापरून मोठे दिखावे फिरवणं सुरू झालं.

शिगमोत्सव शब्द आणि जुन्या भाषासुग्गीमाहो हा प्राकृत शब्द आहे. सुगीचे दिवस अशा अर्थाने. सुग्रीष्मक असा संस्कृत शब्द आहे. त्याचाही अर्थ असाच आहे. यावरून शिगमो/शिमगो म्हणायला लागले. ग्रामदेवतेच्या मंदिरात साजरा होणारा सण नंतर इव्हेंट स्वरूपात अधिक भव्य स्वरूपात करायला सुरुवात झाली.

पर्यटन क्षेत्राशी हा सण आकर्षण म्हणून जोडला गेला. युरोपियन प्रवासी आणि इतर परदेशी प्रवासी यांनी वेळोवेळी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये या उत्सवाला 'ट्रायबल होली फोक डान्स' म्हणायला सुरुवात झाली. कारण गावात हे सण मोठ्या उत्साहात साजरा केला जायचा. पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांनी ख्रिश्चन समाजातील कार्निवल परेड मोठ्या प्रमाणात होते बघून शिगमा हा भाविकांपुरता वसंतोत्सव इव्हेंट म्हणून आखायला सुरुवात केली. 'शिगमोत्सव' संपूर्ण गोव्यात महत्त्वाच्या मोठ्या गावात धुमधडाक्यात साजरा करायला लागले.

चार पौराणिक ऐतिहासिक कथा -पुतना मावशीने बाळकृष्णाला मारण्यासाठी केलेला प्रयत्न आणि तिला चतुराईने कृष्णाने मारल्याची आख्यायिका या दरम्यानची असल्याचे मानले जाते. त्यामुळे गोव्यात शिगमोत्सव साजरा होताना पणजीत राधाकृष्ण मंदिरात कृष्णभक्त हटकून जातात.

होलिका आणि प्रल्हाद याची कथा सुद्धा याच्याशी निगडित आहे असे मानले जाते. विष्णू पुराण वाचन आणि होलिका दहन असं काही गावात बघायला मिळेल. काही ठिकाणी माणसं झोपतात आणि चूल पेटवून भात शिजवला जातो पण या माणसांना काही होत नाही असं बोलतात. कामदेवाने साधनेत विलीन भगवान शंकराची आराधना भंग केली.

Goa Shigmotsav
Goa Shigmotsav 2023 : नार्वेत तब्बल 25 वर्षांनंतर साजरा होतोय शिगमोत्सव

त्यावेळी गण आणि कामदेव म्हणजे पोपटी रंगाचा, ऊसाच्या रूपातली शिंग आणि मधमाश्यांचे डंख असणारा प्रेमाचे प्रतिक असणारा हिंदू देव. असं म्हणतात की सति गेल्यावर शंकराला जगाचा तिटकारा वाटू लागला. फुलांचे बाण मारून साधना भंग करण्याचे काम करणाऱ्या प्रेम वाटणाऱ्या कामदेवाने साधनेत भंग केला म्हणून चिडलेल्या शंकराने कामदेवाला भस्म केल्याचं बोललं जातं.

याच प्रसंगानुसार काही गोव्यातील गावात जळत्या होळीतील राख अंगाला लावून काही गावकरी गडे बनून होळी भोवती फेर धरतात. मधूनच फेर झाल्यावर ते जंगलाकडे जातात आणि अदृश्य होतात. अशा काही कथा गावात सांगितल्या जातात.

(लेखिका बोलभाषा ही पर्यटन कंपनी चालवतात)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com