COVID-19 Goa: संचारबंदी २६ जुलैपर्यंत वाढवली; काय राहणार चालू, काय बंद

गोव्याच्या (Goa) संचारबंदीत (Curfew) अजून ८ दिवस वाढ करण्यात आली आहे. वाचा काय राहील चालू आणि काय राहणार बंद (Goa curfew extended till this date: Check whats allowed whats not)
No beach-side parties as curfew in Goa extended till July 26
No beach-side parties as curfew in Goa extended till July 26 Pixabay

पणजी: गोव्याच्या (Goa) संचारबंदीत (Curfew) अजून ८ दिवस वाढ करण्यात आली आहे. राज्यातली संचारबंदी २६ जुलै पर्यंत राहील. मात्र, मागील संचारबंदी आदेश कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कॅसिनो (Casinos in Goa), मसाज पार्लर व्यावसायिकांचा अपेक्षाभंग झाला आहे.

Goa curfew extended till this date: Check whats allowed whats not

राज्यात संचारबंदीमध्ये आणखी एक आठवडा वाढ करण्यात आल्याने सर्व आस्थापने व दुकाने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. राज्यामध्ये कोरोना महामारीची परिस्थिती दिवसेंदिवस सुधारत असल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे संचारबंदीत आणखी काही शिथिलता करतील अथवा ती कायमची उठवतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ही संचारबंदी कायम ठेवण्यात आल्याने आणखी काही दिवस राज्यातील कॅसिनो, सभागृह, कम्युनिटी हॉल किंवा तत्सम जागा, रिव्हर क्रूझ, वॉटर पार्क, करमणूक उद्याने, स्पा, मसाज पार्लर, सिनेमा हॉल, थिएटर, मल्टिप्लेक्स, शॉपिंग मॉल्समधील मनोरंजन झोन असलेल्या व्यावसायिकांना वाट पाहावी लागणार आहे. ९ मे पासून राज्यस्तरीय संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर आता प्रत्येक आठवड्याला राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेत ती शिथिल करण्यात आली आहे.

अनेक ठिकाणी सूचनांचे पालन नाही

संचारबंदी वाढवताना आस्थापने व दुकाने खुली ठेवण्याच्या वेळेमध्येही वारंवार वाढ करण्यात आली आहे. राज्यातील बाजारपेठा तसेच दुकानेही सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येत असल्याने दैनंदिन व्यवहारावर कोणताच फरक पडलेला नाही. संचारबंदी लागू असताना सरकारने मार्गदर्शक नियमांचे पालन करण्याचे निर्देश देऊनही बाजारपेठा, विवाह सोहळे व काही कार्यक्रमांत सूचनांचे पालन होत नाही.

No beach-side parties as curfew in Goa extended till July 26
Goa: तिलारी धरणातून पुढील दोन दिवसांत पाण्याचा विसर्ग अटळ

काय राहणार चालू, काय राहील बंद

- राज्यातल्या जिम ५०% च्या क्षमतेने चालु राहतील.

- दुकाने आणि शॉपिंग मॉल सकाळी ७ ते संध्यकाळी ६ पर्यंत चालू राहतील.

- शाळा आणि महाविद्यालय राहणार बंद

- चित्रपटगृहे पण बंद राहणार

- धार्मिक स्थळे खुली होणार; मात्र १५ पेक्षा जास्ती लोकांना परवानगी नाही

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com