गोवा: कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात आजपासून संचारबंदी लागू

गोवा: कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात आजपासून संचारबंदी लागू
Goa Curfew imposed in the state from today to prevent corona

पणजी: कोविड विषाणू प्रसार रोखण्यासाठी गोव्यात आजपासून रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ३० एप्रिलपर्यंत ही व्यवस्था कायम असेल. दहावी बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यापुढे 15 दिवसांची पूर्वकल्पना देऊन या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. (Goa Curfew imposed in the state from today to prevent corona)

हॉटेल, बार, रेस्टॉरंट, व्यायामशाळा, थिएटर, मल्टीप्लेक्स,कसिनो, बससेवा 50 टक्के क्षमतेसह सुरू राहणार आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी आज उच्च पातळीवर बैठक घेतली. त्यानंतर ११ मंत्री, २८ आमदारांसोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. यानंतर सायंकाळी ही‌ उपाययोजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com