गोवा कस्टमच्या इंटेलिजन्स युनिटने पकडले तब्बल 10 लाखांचे सोने

Goa Customs' intelligence unit seizes gold worth Rs 10 lakh
Goa Customs' intelligence unit seizes gold worth Rs 10 lakh

गोवा कस्टमचे सहाय्यक आयुक्त वाय. बी. सहारे यांच्या अध्यक्षतेखाली दाबोळी विमानतळावर (Dabolim Airport) केलेल्या कारवाईत गोवा कस्टमच्या इंटेलिजन्स युनिटने केरळच्या कासारगोड येथे राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशास अटक करून त्याच्याकडून 232 ग्राम वजनाच्या सोन्याची पट्टी हस्तगत केली. या सोन्याची किंमत 10 लाख रुपये एवढी होत आहे.

गोवा: पर्वरीतील सुकूर, मार्रा पिळर्णमध्‍ये आमदारांनी केली कोविड विरोधी जनजागृती
सदर प्रवाशी शारजाह येथून एअर अरेबिया (जी9 492) या विमानातून (Aeroplane) आला होता. सदर सोन्याची पट्टी त्याच्या चेक इन बॅगेजमध्ये लपवल्या होत्या. सीमा शुल्क कायदा 162 च्या तरतुदीनुसार हे सोने हस्तगत करण्यात आले. गेल्या पंधरवड्यात गोवा कस्टमच्या इंटेलिजन्स युनिटकडून ही दुसरी जप्ती आहे. 2021 च्या वर्षात गोवा कस्टमच्या इंटेलिजन्स युनिटने ताब्यात घेतलेल्या सोन्याचे एकूण मूल्य 1.81 कोटी एवढे होत आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com