महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर 'तौकते' चक्रीवादळाची शक्यता

Goa Cyclone Tauktae likely to hit coastal state this weekend
Goa Cyclone Tauktae likely to hit coastal state this weekend

नवी दिल्ली: कोरोनाच्या(Covid-19) चिंताजनक परिस्थितीत भारतीय हवामान खात्याने (IMD) 16 मे रोजी अरबी समुद्रात(Arabian Sea) चक्रीवादळ वादळ(Hurricane storm) होण्याची शक्यता वर्तविली आहे. हे चक्रीवादळ यावर्षी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर(India West Coast) आदळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या वादळाला 'तौकते'(Tauktae) असे नाव दिले जाणार आहे.(Goa: Cyclone Tauktae likely to hit coastal state this weekend)

आयएमडीने म्हटले आहे की, '14 मे रोजी सकाळी दक्षिण-पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे पट्टे तयार होण्याची शक्यता आहे.' दक्षिण-पूर्व अरबी समुद्राकडे आणि लक्षद्वीप क्षेत्राच्या उत्तर-वायव्य दिशेने जाणारे आणि आसपासच्या परिसरात हे वादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. 15 ते 16 मे दरम्यान पूर्व-मध्य अरबी समुद्रावर चक्रीवादळामध्ये तीव्रतेने वाढू शकते आणि पुढे ते उत्तर-वायव्येकडे जावू शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

कमी दाबाच्या पट्टयामुळे केरळ आणि लक्षद्दीप येथे 14 ते 15 मे दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तामिळनाडू आणि कर्नाटकात 15 मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरुवारपासून समुद्राची स्थिती उग्र होण्याची शक्यता असल्याने आयएमडीने मच्छीमारांना 13 मेपासून म्हणजेच आज सकाळपासून केरळ किनारपट्टीसह दक्षिण-पूर्व अरबी समुद्री, मालदीव, कोमोरिन आणि लक्षद्वीप भागात जाऊ नका असा सल्ला दिला आहे. 

पूर्व-मध्य अरबी समुद्राकडे आणि कर्नाटकच्या किनारपट्टी व त्याबाहेरील प्रदेशांना 14 मेपासून समुद्रांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे, तर महाराष्ट्र व गोव्याच्या समुद्रकिनारी असणाऱ्यांना 15 मेपासून समुद्राकडे  न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याआधीच कालपासूनच समुद्रात असलेल्या मच्छिमारांना 12 मेच्या रात्रीपर्यंत किनाऱ्यावर परत जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com