Goa News: वर्ना, मार्गो आणि बोग्मालो; नावांची लावली पुरती वाट

Goa News: नामफलकावर लिहिलेली गावांची नावे चुकीच्या पद्धतीने लिहिलेली आहेत.
Goa News
Goa News Dainik Gomantak

Goa News: दाबोळी राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य नाक्यावर बसवण्यात आलेल्या कमानीवरील नामफलकावर लिहिलेली गावांची नावे चुकीच्या पद्धतीने लिहिलेली आहेत. तीन वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या या कमानीवरील या नावांची अजून दुरुस्ती होत नसल्याबद्दल नागरिकांनी संताप व्‍यक्त केला आहे.

यात वेर्णाचे वर्ना, मडगावचे मार्गो, बोगमाळोचे बोग्मालो असे नामकरण करून अर्थाचा अनर्थ केला आहे. वरुणापुरी ते वेर्णा हा राष्ट्रीय महामार्ग होऊन आता कित्येक वर्षे झाली. नंतर ज्या ज्या ठिकाणी मुख्य नाके आहेत, तेथे मोठ्या कमानी उभारून त्यावर नामफलक लावण्यात आले.

यात दाबोळी मुख्य नाक्यावर उभारण्यात आलेल्या तीन रस्त्यांवरील नामफलक वेर्णा, मडगाव तसेच बोगमाळो गावाचा दिशादर्शक दाखवतो. इंग्रजीतून लिहिताना या गावांचा उल्लेख बरोबर केला आहे. मात्र मराठीतून चुकीची नावे लिहिली आहेत.

Goa News
CM Inspected Sal River Pollution: साळ नदी की गटार गंगा; मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आज मंगळवारी या नाक्याजवळ उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. यावेळी शेकडो नागरिक तेथे जमले होते. त्यांच्या नजरेस नामफलक पडले असता त्यांनीही नाराजी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com