Goa Dahi Handi: राज्‍यात दहीहंडीचा कार्यक्रम साधेपणाने साजरा

कोरोनामुळे थर झाले कमी (Goa Dahi Handi)
'Dahi Handi' Near Mahalakshmi Temple, Panaji (Goa Dahi Handi)
'Dahi Handi' Near Mahalakshmi Temple, Panaji (Goa Dahi Handi)Dainik Gomantak

Goa Dahi Handi: भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस अर्थात जन्माष्टमी (Jamnashtami) काल सोमवारी साजरी झाल्यानंतर आज मंगळवारी राज्याच्‍या काही भागांत दहीहंडीचा थरार (Dahi Handi) रंगला. कोरोना महामारीमुळे अनेक निर्बंध असल्याने साधेपणाने हा कार्यक्रम पार पडला. गतवर्षी कोरोनाचे संकट अधिक गडद होते. त्यामुळे दहीहंडीचा कार्यक्रम झाला नव्हता.

'Dahi Handi' at St. Inez, Panaji (Goa Dahi Handi)
'Dahi Handi' at St. Inez, Panaji (Goa Dahi Handi)Dainik Gomantak

मात्र आता हळूहळू परिस्‍थिती सुधारत असल्‍याने राज्याच्‍या काही भागांप्रमाणेच पणजीतही दहीहंडीचा (Dahi Handi at Panjim) कार्यक्रम पार पडला. पणजीतील श्री महालक्ष्मी मंदिर परिसर (Mahalaxmi Temple, panaji), बोक द व्हॉक येथील श्री साईमंदिर परिसर (Boca - Da - Voca, Sai Mandir), मळा येथील झरीकडे, सांतिनेज, भाटले आदी परिसरात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. लाऊड स्पिकर लावण्यास बंदी असल्याने देवस्थान परिसरातील दहीहंडी शांततेत झाल्या.

'Dahi Handi' Near Mahalakshmi Temple, Panaji (Goa Dahi Handi)
Goa: मातीच्या सुंदर गणेश मूर्ती बनवण्याचा वारसा चालवणारे साजरो शेटगावकर

‘‘गोविंदा रे गोपाळ... यशोदेच्या तान्ह्या बाळा’’ आदी अंगात उत्साह निर्माण करणाऱ्या गाण्यांचे आवाज मोठ्या प्रमाणात घुमले नाहीत. श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून, कमी अंतरावर दहीहंडी बांधून ती फोडण्यात आली. मात्र, सांतिनेज भागात राजकीय नेत्यांनी दहीहंडी पुरस्कृत केली होती. तेथे कर्णकर्कश संगीत लावून धिंगाणा घालण्यात येत होता. तेथील दहीहंडी रात्री उशिरा फोडण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com