Goa Dairy: डेअरीतील गळतीप्रकरणी यंत्रणांकडून चौकशी करा

पशुखाद्य प्रकल्पाचे काम पाचनंतर बंद असताना पावणे सहाच्या दरम्यान हा प्रकार कसा काय घडला.
Goa Dairy Blast
Goa Dairy BlastDainik Gomantak

Ponda: गोवा डेअरीच्या उसगाव येथील पशुखाद्य प्रकल्पात झालेला स्फोट व गळती प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने अथवा सीबीआयने सखोल चौकशी करावी. त्यासाठी गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी आधी पोलिस तक्रार नोंद करावी, आम्ही चौकशीला तयार आहोत, असे आव्‍हान गोवा डेअरीच्या प्रशासकीय समितीचे माजी अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांनी दिले आहे.

फोंड्यात आज शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिरोडकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सहकारमंत्री सुभाष शिरोडकर (Cooperation Minister Subhash Shirodkar) यांनी या प्रकरणाच्‍या चौकशीसाठी आदेश द्यावेत, असे सांगितले. गोवा डेअरीच्या पशुखाद्य प्रकल्पाच्या टाकीची दुरुस्तीची नव्हे तर संबंध प्रकल्पाची चौकशी करावी, असे सांगताना प्रकल्पाला आच्छादन केलेल्या पत्र्यांचीही तेवढीच आत्मियतेने चौकशी व्हावी, असेही ते म्‍हणाले. या पशुखाद्य प्रकल्पाच्या आवारात व इतर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे पूर्ण रेकॉर्डिंग तपासून पाहावे, असे शिरोडकर यांनी सांगितले.

Goa Dairy Blast
Goa Agriculture| नैसर्गिक शेती उपक्रम लवकरच सुरू करणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पशुखाद्य प्रकल्पाचे काम पाचनंतर बंद असताना पावणे सहाच्या वेळेला हा प्रकार कसा काय होतो, असा सवाल करून याप्रकरणी निश्‍चितच काळेबेरे असल्याचा संशय शिरोडकर यांनी व्‍यक्त केला. आधी पशुखाद्य (Animal Feed ) प्रकल्पाच्या प्रमुखाची चौकशी करा. दुरुस्तीनंतर संजीवनी साखर कारखान्याची 400 टन मोलेसिस या टाकीत असताना काहीच झाले नाही; मात्र आता फक्त 35 टन मोलेसिस टाकीत असताना कसा काय स्फोट होतो, असा सवालही दुर्गेश शिरोडकर यांनी उपस्‍थित केला.

Goa Dairy Blast
...तर महासागरात टाकलेले मायक्रोप्लास्टिक मानवी शरीरातही प्रवेश करेल - NCPOR

दुर्गेश शिरोडकर, गोवा डेअरीचे माजी अध्यक्ष

निविदाप्रकरणी घोळ झाला आहे असे जर राजेश फळदेसाई यांना वाटत असेल तर त्यांनी पुराव्यांनिशी ते सिद्ध करावे. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असेल असा आरोप असेल तर ते सांगायला आपण त्यातील तज्ज्ञ नाही. प्रशासकीय समितीच्या बैठकीत दुरुस्तीचा निर्णय घेतला त्याप्रमाणे दुरुस्ती करण्‍यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com