गोवा डेअरीची निवडणूक खंडपीठाच्‍या निर्णयावर अवलंबून

गोवा डेअरीची निवडणूक येत्या रविवारी 19 जूनला ठेवण्यात आली आहे
गोवा डेअरीची निवडणूक खंडपीठाच्‍या निर्णयावर अवलंबून
Goa Dairy ElectionDainik Gomantak

पणजी : गोवा डेअरीच्या निवडणुकीसाठी मतदान हक्काबाबत सादर केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून त्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ जो काही निर्णय देईल त्यावर या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असेल. गोवा डेअरीची निवडणूक येत्या रविवारी 19 जूनला ठेवण्यात आली आहे.

त्यापूर्वी हा निर्णय येण्याची शक्यता असल्याने त्याकडे दुग्ध उत्पादन संस्थांचे लक्ष लागून राहिले आहे. आंत आंद्रे येथील दुग्ध उत्पादन संस्थेचे अध्यक्ष रमेश एडायडन यांनी मुंंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सहकार निबंधकाच्या आदेशाला आव्हान देण्‍यात आलेले आहे. निबंधकांनी ही निवडणूक 19 जूनला घेण्याचा आदेश काढला आहे. याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत ही गोवा डेअरीची निवडणूक प्रक्रिया स्थगित ठेवण्याची विनंती याचिकादाराने केली होती.

Goa Dairy Election
रेल्वे मार्ग विस्ताराबाबत जुलैमध्ये खटला सुरू

उच्च न्यायालयाने गोवा डेअरीची आगामी 19 जूनची निवडणूक स्थगित केली नसल्याने आव्हान याचिकेवरील निर्णय निवडणुकीपूर्वी होण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान, या याचिकेवरील सुनावणीदरम्‍यान राजेश फळदेसाई यांनी उच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज सादर केला होता व याचिकेला विरोध केला होता. त्यावरही सुनावणी झाली असून त्यासंदर्भात खंडपीठाकडून काय निर्णय दिला जातो यावरही निवडणुकीचे भवितव्य अलंबून आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com