Goa: दलित महासंघातर्फे पिसुर्लेतील अनुराधा परवार ला आर्थिक मदत

याची दखल घेऊन अखिल गोवा दलित महासंघाच्या (All Goa Dalit Federation) वतीने तिला आर्थिक मदत देण्यात आली.
Goa: दलित महासंघातर्फे पिसुर्लेतील अनुराधा परवार ला आर्थिक मदत
Anuradha Ankush ParvarDainik gomantak

पिसुर्ले: पर्ये मतदार संघात (Parye Constituency) येणाऱ्या पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील देऊळवाडा प्रभातील हरीजन वाड्यावरील अनुराधा अंकुश परवार (Anuradha Ankush Parvar) या महीलेचे काही दिवसांपूर्वी संततधार पडणाऱ्या पावसामुळे घर कोसळून एक मुलगी व तिला बेघर होण्याची पाळी आली होती. याची दखल घेऊन अखिल गोवा दलित महासंघाच्या (All Goa Dalit Federation) वतीने तिला आर्थिक मदत देण्यात आली.

सदर अनुराधा ही दलित समाजातील असुन काही वर्षांपूर्वी तीचा नवरा वारला होता, त्यामुळे मिळेल ते काम करून आपल्या व मुलींचे पालन पोषण करीत होती, परंतू काही दिवसांपूर्वी ती राहत असलेले घराचा एक भाग कोसळून संपूर्ण घर राहण्यासाठी असुरक्षित बनले होते, त्यामुळे तीला व मुलीला शेजारच्या घरात आसरा घेण्याची पाळी आली होती.

Anuradha Ankush Parvar
Goa: सेंट ॲना सायबिणीचे फेस्‍त एक ऑगस्टला

सदर घटनेची दखल दलित समाजासाठी कार्यरत असलेल्या अखिल गोवा दलित महासंघाच्या वतीने घेऊन तिच्या घरी भेट देऊन खरी परीस्थिती जाणुन घेतली, व तिला रोख रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे, या वेळी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा चोपडेकर, दिना निरावडेकर, पुनाजी पार्सेकर, कमलाकर परवार, यशवंत पार्सेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com