Goa: दुकानात वीज कोसळल्याने नुकसान

अनर्थ टळला, मात्र पावसाचा जोर कायम (Heavy Rain)
Goa: दुकानात वीज कोसळल्याने नुकसान
वीजेचे प्रतिकात्मक चित्र दैनिक गोमन्तक

डिचोली: गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसाचा तडाखा चालूच असून, आज रात्री डिचोलीसह बहूतेक भागात जोरदार पर्जन्यवृष्टी (Heavy Rain) झाली. दरम्यान, विजेचा लखलखाट आणि ढगांच्या गडागडाटासह काल रात्री पडलेल्या जोरदार पावसावेळी कारापूर-तिस्क येथील 'सावईकर स्टोअर्स' या दुकानावर वीज कोसळली (lightning strike on shop). दुकान बंद असताना रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वृत्तपत्र विक्रेते रमेश सावईकर यांच्या मालकीचे हे दुकान असून, या घटनेत दुकानातील वीज जोडणी तसेच किराणा साहित्य जळाले. त्यामुळे श्री. सावईकर यांचे 35 ते 40 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

वीजेचे प्रतिकात्मक चित्र
Goa: मजूर वीज खांबावरून पडल्यास जबाबदार कोण ?

अनर्थ टळला

दुकानावर वीज कोसळली तेव्हा मोठा कडकडाट झाला. दुकानाच्या विरुद्ध बाजूने चालू असलेल्या फास्टफूड वाल्याच्या लक्षात ही घटना आली. घटना घडली, त्यावेळी दुकानाच्या बाहेर दोघेजण झोपले होते. मात्र विजेचा लोळ छपरातून आतिल बाजूने घुसल्याने मोठा अनर्थ टळला. संबंधित मालकाला कळताच ते दुकानापाशी आले. डिचोली अग्निशमन दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधिकारी मुकुंद गवंडी यांनी जवानांसह घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत आग बरीच आटोक्यात आली होती.

वीजेचे प्रतिकात्मक चित्र
दाबोळीच्या कॉँग्रेससच्या पदाधिकाऱ्यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

पावसाचा कहर सुरूच

गेल्या दोन दिवसांप्रमाणेच बुधवारीही सलग तिसऱ्या दिवशी डिचोलीसह साखळी भागात पर्जन्यवृष्टी झाली. सायंकाळ नंतर पावसाचा जोर सुरु झाला होता. अधूनमधून ढगांचा गडगडाटही सुरु होता. गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा तडाखा चालूच असल्याने यंदा भात पिकावर पाणी फेरल्याताच जमा झाले आहे. त्यामुळे बळीराजा गळीतगात्र बनला आहे. पावसाचा तडाखा चालूच असल्याने शेतकऱ्यांना कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे

Related Stories

No stories found.