Goa News: खड्डे बुजविण्याच्या 'ॲप'ला आता पुढच्या वर्षीचा मुहूर्त!

Goa News: खड्डे बुजविण्यासाठी तयार करण्यात आलेले 'ॲप' पुढच्या वर्षी 2023 मध्ये सार्वजनिक होण्याची शक्यता आहे,
Goa News | Damage Road
Goa News | Damage RoadDainik Gomantak

Goa News: राज्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम जूनपासून जेटपॅचर मशीनद्वारे सुरू आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने डिसेंबरपर्यंत लक्ष्य निश्‍चित केले आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्यासाठी तयार करण्यात आलेले ‘ॲप’ पुढच्या वर्षी 2023 मध्ये सार्वजनिक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याकडून देण्‍यात आली.

सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी सर्वसामान्यांसाठी ॲप लवकरच खुले केले जाणार असल्याची घोषणा केली होती. परंतु आता त्‍यासाठी विलंब होणार हे स्पष्ट झाले आहे. पावसामुळे खड्डे बुजविण्याच्या कामात अडथळे निर्माण झाले आहे.

Goa News | Damage Road
Goa Government: गोव्यात अमली पदार्थांविरोधात मोहिमेवर केंद्रीय गृहमंत्री समाधानी

एकदा बुजविलेले खड्डे पावसामुळे पुन्हा निर्माण होत असल्याने जेटपॅचर मशीनचे काम वाढले आहे. त्यामुळे हा विलंब होणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाचे मुख्य अभियंता दिनेश गुप्ता यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना स्पष्ट केले. जूनपासून जेटपॅचर मशीनद्वारे काम सुरू झाले असून सध्या राज्‍यात तीन मशीन्‍स कार्यरत आहेत.

सर्व खड्डे बुजविल्‍यानंतरच 'ॲप' करणार सार्वजनिक!

खड्डे बुजविण्यासाठी तयार करण्यात आलेले ‘ॲप’ खात्याअंतर्गत वापरले जात आहे. जेव्हा खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण होणार, तेव्हा ॲप सार्वजनिक केले जाईल. आता या क्षणाला ते सर्वसामान्यांसाठी खुले केल्यास गोंधळ निर्माण होणार आहे. सध्या खात्यातील कर्मचाऱ्यांकडून खड्डे ओळखण्यात येत आहे.

तसेच, त्यानंतर जेटपॅचर मशीनद्वारे ते बुजविले जातात. परंतु ॲप सार्वजनिक केल्यास सगळे जण आपल्या परिसरातील रस्‍त्यांना पडलेल्या खड्ड्यांचे फोटो पाठवायला लागतील. त्यामुळे काहीच काम होणार नाही आणि नागरिकांची गैरसोय होईल. म्हणून सर्व खड्डे बुजविल्यानंतरच ॲप सार्वजनिक केले जाईल, असे गुप्ता म्हणाले.

Goa News | Damage Road
Goa News: कदंबला दीड कोटी नफा; तर 255 कोटींची तूट!

दिनेश गुप्ता, साबांखा रस्ता विभाग मुख्य अभियंता-

सध्या राज्‍यात तीन जेटपॅचर मशीन्‍स कार्यरत असून उत्तर गोव्यात एक आणि दक्षिण गोव्यात दोन आहेत. प्रत्येक मशीनला किमान 20 हजार चौरस मीटर क्षेत्रफळ देण्यात आलेय. पावसामुळे अडथळे निर्माण झाल्याने डांबराचे मिश्रण योग्यपणे होत नव्हते.

परिणामी खड्डे बुजविण्यासाठी घातलेले डांबर वाहून जाण्याचे प्रकार घडले. ते पुन्हा दुरुस्त करण्यात अतिरिक्त वेळ गेला.

कर्नल मिलिंद प्रभू, तज्ज्ञ-

खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने जेटपॅचर मशीन आणले आहे. तरीसुद्धा विलंब होत आहे. अनेक ठिकाणी जेटपॅचर मशीनद्वारे करण्यात आलेले काम हे निकृष्ठ दर्जाचे झाल्याने पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहे. बिटुमेन जास्त किंवा कमी प्रमाणात वापरल्याने ही परिस्थिती निर्माण होते. त्यासाठी बिटुमेनचा वापर योग्य प्रमाणात होणे आवश्‍यक असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com