गोवा: ''दामू नाईक याच्याकडून सरकारी कर्मचारी व फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांना धमक्या''

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 14 एप्रिल 2021

सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे सत्र नाईक यांनी सुरु केले आहे, असा आरोप गोवा फाॅरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केला आहे.

मडगाव : मडगाव पालिका निवडणुकीत गोवा फाॅरवर्डच्या फातोर्डा फाॅरवर्ड पॅनलला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपचे फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक यांना पोटशूळ उठला असून फातोर्डा फा्ररवर्डच्या उमेदवारांना पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांना व सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे सत्र नाईक यांनी सुरु केले आहे, असा आरोप गोवा फाॅरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केला आहे.

 नाईक यांच्या विरुद्ध राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार असून तक्रारीची प्रत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पाठवण्यात येणार आहे. असे कामत यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.  फातोर्डा फाॅरवर्डच्या उमेदवारास पाठिंबा देणाऱ्या घरातील सरकारी कर्मचाऱ्यास पेडणे येथे बदली करण्याची, तर अन्य एका कार्यकर्त्यास घर पाडण्याची धमकी देण्यात आली आहे, असे कामत यांनी सांगितले. (Goa Damu Naik threatens government employees forward activists) 

गोवा: नागरिकांच्या उत्तम प्रतिसादामुळे, सध्या लॉकडाऊनची गरज नाही

आधीच सरकारी कमर्चाऱ्यांचे नुकसान करणारे निर्णय घेतलेले भाजप सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधी असल्याचे यातून सिद्ध होते, असे मत कामत यांनी व्यक्त केले.  नाईक हे मर्यादा ओलांडत असून ही दादागिरी खपवून घेण्यात येणार नाही असा इशारा कामत यांनी दिला. 

गोवा फाॅरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी फातोर्डाचा कसा विकास केला आहे त्याची फातोर्डावासीयांना जाणीव आहे. म्हणूनच पालिका निवडणुकीत फातोर्डा फाॅरवर्डच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, असा दावा कामत यांनी केला. 

 

संबंधित बातम्या