'मोदींच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठीच राज्यात कोळसा हब करण्याचा सरकारचा डाव' 

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

केंद्र आणि राज्य सरकार यांनी गोव्याच्या नाशाचा प्रयत्न सुरू केले आहेत. सार्वजनिक आरोग्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. हजारो झाडांची कत्तल करून निसर्गाला हानी पोहचणार आहे. शिवाय यात लोकांच्या आरोग्याचे प्रश्न प्रकर्षाने पुढे येतील, असा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरिश चोडणकर यावेळी दिला. 

पणजी: नरेंद्र मोदी यांच्या क्रोनी क्लबच्या फायद्यासाठीच सावंत यांच्या नेतृत्वाखालील डिफेक्टिव्ह भाजप सरकार गोव्यात कोळसा हब करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरिश चोडणकर यांनी केला आहे. 

गोव्यातील पर्यावरणासाठी हानिकारक ठरणारे प्रकल्प राबविण्यास आमचा विरोध आहे. आम्ही या कोळसा हबला विरोध करू. गोव्याचा नाश होईल असे काहीही आम्ही घडू देणार नाही. केंद्र आणि राज्य सरकार यांनी गोव्याच्या नाशाचा प्रयत्न सुरू केले आहेत. सार्वजनिक आरोग्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. हजारो झाडांची कत्तल करून निसर्गाला हानी पोहचणार आहे. शिवाय यात लोकांच्या आरोग्याचे प्रश्न प्रकर्षाने पुढे येतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

पुढे बोलताना ते म्हणाले की,  या प्रकरणी मुख्यमंत्री सावंत आणि त्यांचे मंत्री व पदाधिकाऱ्यांचे हितसंबंध अडकलेले आहेत. त्यामुळे ते केवळ आपल्या स्वार्थासाठीच लोकांना मृत्यूच्या खाईत लोटत आहेत. सागरमाला प्रकल्प, रेल्वे दुपदगीकरण तसेच कोळसा वाहतुकीसाठी एक रस्ता केल्यानंतर त्याचे गोव्यातील जनतेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतील. रेल्वे कायदा अंमलात आणून दुपदरीकरणाचे काम करावे असा सल्ला मुख्यमंत्री सावंत आणि वाहतूक मंत्री मॉविन यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना देणे ही धक्कादायक बाब असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. लोकभावनांच्या आड येत असलेले कायदे बदलण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू, असेही ते यावेळी म्हणाले. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या