Goa: फळ-भाजी मार्केटात सुविधा पुरवा- काँग्रेसची मागणी
डिचोली बाजार संकुलाबाबत काँग्रेसतर्फे डिचोली पालिकेला निवेदन दिले Dainik Gomantak

Goa: फळ-भाजी मार्केटात सुविधा पुरवा- काँग्रेसची मागणी

पालिकेची जुनी मार्केट इमारत दिवसेंदिवस कमकुवत बनत चालली आहे. धोकादायक बनलेल्या या इमारतीची पालिकेने स्थेर्यता तपासून आवश्यक ते दुरुस्तीकाम हाती घ्यावे.

डिचोली: बाजार संकुलात आवश्यक त्या मूलभूत सुविधा त्वरित पुरवा. अशी मागणी डिचोली गट काँग्रेसने (Congress) केली असून, त्यासंबंधी काँग्रेसतर्फे आज दुपारी डिचोली पालिकेला निवेदन दिले आहे. मार्केटमधील गैरसोयी त्वरित दूर केल्या नाहीत, तर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही देण्यात आला आहे.

डिचोली गट काँग्रेसचे अध्यक्ष अर्जुन (नितीन) परब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी डिचोली पालिकेचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर फळ-भाजी मार्केटची हालत मांडली.

डिचोली बाजार संकुलाबाबत काँग्रेसतर्फे डिचोली पालिकेला निवेदन दिले
दिवाळीच्या पूर्वसंध्येला डिचोली बाजार फुलला

बाजार संकुलातील (market complex) फळ-भाजी मार्केटात वीज आदी समस्या असून, अस्वच्छताही निर्माण झाली आहे. त्यामुळे विक्रेत्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. असे या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी श्री. शिरगावकर यांच्या निदर्शनास आणून दिले. काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मार्केटमधील समस्या सोडविण्याची ग्वाही मुख्याधिकाऱ्यांनी या कार्यकर्त्यांना दिले.

बाजार इमारत कमकुवत

दरम्यान, पालिकेची जुनी मार्केट इमारत दिवसेंदिवस कमकुवत बनत चालली आहे. धोकादायक बनलेल्या या इमारतीची पालिकेने स्थेर्यता तपासून आवश्यक ते दुरुस्तीकाम हाती घ्यावे. अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. अधूनमधून या इमारतीच्या स्लॅबचे तुकडे पडत आहेत. त्यामुळे एखादेवेळी विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी भीती काँग्रेसने व्यक्त केली आहे.

यावेळी मेघ:श्याम राऊत, प्रदेश समितीचे नझीर बेग, महिला गट काँग्रेसच्या अध्यक्ष मारिया (जेनेट) सोझा, बालाखान गौरी, गुरूदास गावकर आदी कार्यकर्ते होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com