Goa:वास्कोत मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड, उपजिल्हाधिकाऱ्यांची बैठक

वास्को शहरातील दुर्मिळ झालेली झाडे व त्यांची होणारी पडझड याबद्दल गोवा (Goa) कॅनने चिंता व्यक्त केली होती
Goa: Deputy Collector's meeting on  Massive tree fall in Vasco
Goa: Deputy Collector's meeting on Massive tree fall in Vasco Dainik Gomantak

झाडे उन्मळून पडून होणारी हानी टाळण्यासाठी तसेच यासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक वास्को येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडली. या बैठकीत या प्रकरणाचा विचार विनिमय करून मुरगावचे उपजिल्हाधिकारी दत्तराज देसाई यांनी संबंधित यंत्रणेला विविध सूचना केल्या आहेत.

वास्को शहरातील दुर्मिळ झालेली झाडे व त्यांची होणारी पडझड व नुकतेच चतुर्थीपूर्वी वास्को मार्केट परिसरात गजबजलेल्या ठिकाणी गुलमोहोराचे झाड उन्मळून पडल्याने झालेल्या नुकसानीबद्दल मुरगावचे उपजिल्हाधिकारी दत्तराज देसाई यांना पत्र लिहून गोवा कॅनने चिंता व्यक्त केली होती. अशा घटना भविष्यात घडू नये मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक बोलावण्याची मागणी करण्यात आली होती.त्यानुसार उपजिल्हाधिकारी दत्तराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती.या बैठकीस गोवा कॅनचे रोलांड मार्टिन्स, नगराध्यक्ष दामोदर कासकर, सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाचे विन्सेंट डिसोझा, गटविकास अधिकारी प्रसिद्ध नाईक, अग्निशमन दलाचे फ्रान्सिस्को मेंडेस,मुरगाव नगरपालिकेचे सेनिटरी निरीक्षक महेश कुडाळकर, सार्वजनिक बांधकाम पाणी विभागाचे यशवंत नाईक, मार्कोस डिकाॅस्टा, नगरसेवक प्रजल मयेकर, डॉक्टर सुजाता कामत, डॉक्टर अनुराधा सूर्यवंशी,एडीईआय वलसला विश्वंभर, वास्को पोलीस उपनिरीक्षक प्रज्योती देसाई, वाहतूक विभाग प्रमुख प्रभाकर खेडेकर, वीज अभियंता संजीव माशेलकर,पी.एल. नाईक तसेच लायन्स क्लबचे सुनील कवळेकर या बैठकीस उपस्थित होते. वन विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने उपजिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

Goa: Deputy Collector's meeting on  Massive tree fall in Vasco
Goa Politics: तरुणांच्या रोजगारावरून भाजप-आप आमनेसामने !

पंधरा दिवसांपूर्वी वास्को मार्केटमध्ये झाड उन्मळून पडल्याने सात वाहनांची मोडतोड होऊन संबंधितांना नुकसान सहन करावे लागले. यापूर्वी २२रोजी स्वातंत्र्यपथावरील एक अशोक वृक्ष उन्मळून दुचाकीस्वार सतीश गावकर यांच्यावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता. तसेच वीज खांब व वाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.त्यानुसार उपजिल्हाधिकारी देसाई यांना पत्र लिहून गोवा कॅनचे रोलँड मार्टिन्स यांनी काही शिफारशी केल्या होत्या. मुरगाव पालिका, वन विभाग, वाहतूक पोलिस, वाहतूक खाते, वीज खाते, वास्को पोलिस, सार्वजनिक बांधकाम खाते, वास्को अग्निशमन दल यांची तातडीने बैठक बोलावून झाडे पडण्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी रोडमॅप तयार करावा. मुरगाव पालिकेने स्वातंत्र्य पथावरील व इतर ठिकाणच्या सर्व झाडाची यादी व इतर माहिती तयार करावी. वनखात्याने संबंधित झाडाचा प्रकार, त्याचे आयुर्मान, छाटणीची गरज, नजीकच्या काळात झाडाची स्थिती कशी असेल, यासंबंधी माहिती द्यावी. वीज खात्याने झाडांजवळ असलेले खांब व ट्रान्स्फॉर्मरची यादी व इतर माहिती तयार करावी. अग्निशमन दल व वनखाते यांनी नजीकच्या काळात उन्मळून पडण्याची शक्यता आहे त्या झाडांची माहिती द्यावी अशी शिफारस केली होती. या पत्राच्या प्रती मुख्य सचिव, नगरविकास सचिव, जिल्हाधिकारी, गोवा अग्निशामक सेवा, पालिका,मुख्य वीज अभियंते, प्रधान मुख्य वनसंरक्षक, वाहतूक पोलिस अधीक्षक व इतरांना पाठविल्या होत्या.

Goa: Deputy Collector's meeting on  Massive tree fall in Vasco
Goa Vaccination: राज्यात लवकरच 100 टक्‍के लसीकरण पूर्ण होणार,आरोग्य मंत्र्यांचे प्रतिपादन

दरम्यान गोवा कॅनचे रोलांड मार्टिन्स यांच्या मागणीनुसार संबंधितांची संयुक्त बैठक घेऊन विचारविनिमय करून त्यावर योग्य ते मार्गदर्शन उप जिल्हाधिकाऱ्यां मार्फत करण्यात आले व आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.संबंधीत अधिकाऱ्यांनीही आपल्या समस्या मांडल्या.यावर गोवा कॅनचे रोलांड मार्टिन्स यांनीही आवश्यक त्या सूचना केल्या व या कामी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com