Goa: गोव्यातील देविदास भांडणकर यांचा देहदानाचा निर्णय!

Goa: गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलकडे कागदपत्रे सुपूर्द केली आहेत.
Goa | Devidas Bhandankar
Goa | Devidas BhandankarDainik Gomantak

Goa: समाजाने आपल्याला काय दिले, यापेक्षा समाजाला आपण काय देऊ शकतो, याचा विचार करणारे अवघेच असतात. त्याला वयाचे आणि काळाचेही बंधन नसते. या समाजकार्यातील यज्ञात आपल्या परीने समिधा टाकण्याच्या उदात्त भावनेने वयाच्या 68 व्या वर्षी देविदास विष्णू भांडणकर यांनी देहदान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

दरम्यान, त्यासंबंधीची कागदपत्रे त्यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळाकडे सुपूर्द केली आहेत. वास्तविक देहदान किंवा अवयव दानासाठी समाजातून सहसा कुणीही पुढे येत नाही. मृत्युपश्चात आपल्या अवयवामुळे कुणाला तरी नवसंजीवनी प्राप्त होऊ शकते.

Goa | Devidas Bhandankar
Goa Government: गोंयकार संघटनेचा रस्ता चौपदरीकरणासाठी वृक्षतोडीला 'तीव्र' आक्षेप!

तसेच, अशा रुग्णाच्या अथवा त्याच्या कुटुंबीयांच्या आनंदात अवयवरूपाने सहभागी होऊ शकतो, ही भावनाच मुळी आनंददायी आहे. याचा प्रत्यय घेणे ही तेवढीच वेगळी अनुभूती आहे आणि देविदास भांडणकर यांनी आपल्या कर्तृत्वाने एक वेगळेच उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.

वाढदिनाच्या पूर्वसंध्येला संकल्प

देविदास भांडणकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी, म्हणजे 6 ऑक्टोबर रोजी या संकल्पासंबंधीची कागदपत्रे पूर्ण केली. देविदास यांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबीयांनी पूर्ण पाठिंबा दशर्वला असल्याने मूळचे आडपई-दुर्भाटचे; पण सध्या फोंड्यात राहाणारे भांडणकर कुटुंब कौतुकास पात्र ठरले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com