राज्याचे पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीना यांना कोरोनाची लागण

team dainik gomantak
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

राज्याचे पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना यांना काही दिवसांपासून ताप येत असल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली. आज त्यांचा चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने त्यांनी स्वत:चे विलगीकरण करत पुढील उपचारांसाठी खासगी रूग्णालय गाठले. 

पणजी- राज्याचे पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना(DGP) यांना कोरोनाची लागण झाली आहे. पुढील उपचारांसाठी त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 मीना यांना काही दिवसांपासून ताप येत असल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली. आज त्यांचा चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने त्यांनी स्वत:चे विलगीकरण करत पुढील उपचारांसाठी खासगी रूग्णालय गाठले.

गोव्यातील पोलिस यंत्रणा बळकट करण्यासाठी दैनंदिन बैठका घेत ते रोज सद्यस्थितीचा आढावा घेत होते. त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाल्याने आता पुढील काही दिवस त्यांना उपचारांसाठी दवाखान्यात रहावे लागेल. त्यांनी जुलैमध्ये गोव्याच्या पोलिस महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यापूर्वी ते मिझोरमच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी कार्यरत होते.    

संबंधित बातम्या