गोवा धनगर समाज सेवा संघाची निराधारांना आधार योजना सुरू

गांधी जयंती निमित्त निराधारांना दिलासा, ज्ञाती बांधवांना होणार लाभ
गोवा धनगर समाज सेवा संघाची निराधारांना आधार योजना सुरू
गोवा धनगर समाज सेवा संघDainik Gomantak

पिसुर्ले: सत्तरी तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या उत्कर्षासाठी गेल्या 31 वर्षांपासून कार्यरत असलेल्या गोवा धनगर समाज सेवा संघाच्या वतीने संस्थापक उपाध्यक्ष स्वर्गीय विठू मुला वरक यांच्या स्मरणार्थ निराधारांना आधार योजना सुरू केली असल्याची घोषणा काल दि 2 अक्टॉबर रोजी भुईपाल येथे साजरी करण्यात आलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती कार्यक्रमात करण्यात आली. सदर योजनेची अंमलबजावणी तात्काळ करून आधार नसलेल्या समाज बांधवांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

गोवा धनगर समाज सेवा संघ
Goa: गांधी जयंतीदिनी खड्डयांवर झोपून आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध

सदर गांधी जयंतीचा कार्यक्रम शकुंतला जोतो पावणे यांच्या निवासस्थानी संपन्न झाला, या प्रसंगी संघाचे अध्यक्ष बि डी मोटे, सचिव पवन वरक, खजिनदार बाबू पावणे, कार्यकरणी सदस्य बिरो काळे, महादेव वरक, तसेच बाबलो वरक, रोहीत कोळाप्टे, विशाल मोटे, वामन दवणे, तुकाराम शेटकर, प्रदीप वरक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना संघाचे अध्यक्ष बि डी मोटे यांनी सांगितले की समाज बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणताना संकटात सापडलेल्या ज्ञाती बांधवांना सुद्धा आधार देण्याची अत्यंत गरज आहे, त्यासाठी संघाचे संस्थापक सदस्य तथा उपाध्यक्ष स्वर्गीय विठू मुला वरक यांच्या स्मरणार्थ निराधारांना आधार योजना सुरू करण्यात येत आहे, या योजने अंतर्गत एकद्या समाज बांधवांच्या कुटुंबांतील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यानंतर संकटात सापडलेल्या त्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

गोवा धनगर समाज सेवा संघ
Goa Bhumiputra Bill: धनगर बांधवांची 415 घरे नावावर होणार

त्याच प्रमाणे समाज बांधवांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्तरावर पुढे आणण्यासाठी बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रात पुढील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योजना आखून संघाच्या वतीने नीट परीक्षे संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी संघाच्या वतीने शिक्षकांची नेमणूक करून वर्ग घेण्यात येणार आहे, त्यासाठी समाजातील विद्यार्थ्यांनी संघाकडे संपर्क साधून दि 15 अक्टॉबर पर्यंत नाव नोंदणी करावी असे, शेवटी अध्यक्ष बि डी मोटे यांनी सांगितले. सुरवातीस गांधींच्या फोटो पुष्पहार अर्पण व समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव वरक यांनी केले तर, सचिव पवन वरक यांनी आभार व्यक्त केले.

Related Stories

No stories found.