Goa: धनगरी फुगडीचे मिळाले नवीन पीढीला धडे

कोरोना व्हायरसच्या (Covid 19) प्रादुर्भावामुळे सदर वर्ग घेण्यास काही काळ खंड पडला होता, पण त्यानंतर कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सदर वर्गाच्या कालावधीत आणखीन वाढ करून ते पुर्ण केले आहे.
Goa: धनगरी फुगडीचे मिळाले नवीन पीढीला धडे
युवतींना धडे देताना 80 वर्षाच्या गुरू नागी नाऊ वरकDainik Gomantak

पिसुर्ले: गोवा धनगर समाज सेवा संघाच्या पुढाकाराने तसेच कला आणि संस्कृती (Art and culture) संचालनालय गोवा सरकार यांच्या सहकार्याने धनगर समाजातील पारंपरिक फुगडी कलेची जोपासना करून ती फुगडी कायम स्वरुपी जिवंत ठेवण्यासाठी भुईपाल धनगर वाडा येथे आयोजित करण्यात आली.

गुरू शिष्य परंपरा उत्तराधिकारी या पछ्चिम विभाग सांस्कृतिक केंद्र उदयपूर यांच्या योजने अंतर्गत आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गाची सांगता करण्यात आली. या प्रशिक्षण वर्गात धनगर समाजातील ज्येष्ठ कलाकार (Senior artist) नागी नाऊ वरक यांनी गुरू तर गौरवी गंगाराम पावणे यांनी संयुक्त गुरू बनून त्याना धनगर फुगडीचे धडे दिले.

युवतींना धडे देताना 80 वर्षाच्या गुरू नागी नाऊ वरक
उशाला कळसा तरीही पिसुर्ले वासीयांचा घसा कोरडा..!

धनगर समाजातील पारंपरिक फुगडीची जोपासना व्हावी आणि ती कला भावी पिढी पर्यंत पोचावी यासाठी सत्तरी तालुक्यातील नामवंत अशा लोक कला अभ्यासक प्रा पोर्णिमा केरकर यांच्या सहकार्याने गोवा धनगर समाज सेवा संघाने सदर योजनेचा लाभ भुईपाल येथिल मुलींना व्हावा यासाठी कला आणि संस्कृती संचालनालयाकडे प्रस्ताव पाठवला होता, त्याला मंजुरी मिळून जानेवारी 2020 मध्ये गुरू नागी नाऊ वरक हीच्या मार्गदर्शनाखाली वर्ग सुरू झाले होते, परंतू काही दिवसात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सदर वर्ग घेण्यास काही काळ खंड पडला होता, पण त्यानंतर कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सदर वर्गाच्या कालावधीत आणखीन वाढ करून ते पुर्ण केले आहे.

सदर गुरू शिष्य परंपरा उत्तराधिकारी योजनेचा लाभ भुईपाल धनगर वाडा येथील सुषमा वरक, निर्जला वरक, मंजू वरक, सुषमा झोरे, चैताली वरक, प्रिती यमकर, निकिता वरक, भारती ताटे, रेश्मा वरक, भारती वरक या युवतींना झाला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com