पर्यटन व्यवसाय सुरू करण्यास अडचणी

प्रतिनिधी
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

किनारेही नष्ट, पर्यटकांना लसीची प्रतीक्षा

मोरजी: कोरोना महामारीचे महासंकट किनारी भागात आगामी पर्यटन व्यवसायावर होणार आहे , ऐन पर्यटन हंगामात कोरोना मुळे लॉकडाऊन करून करोडो रुपये उलाढाल मंदावली. जोपर्यंत कोरोनाची लस मिळत नाही तो पर्यंत पर्यटक राज्यात येण्यासाठी घाबरत आहे. यंदाही पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यावसायीकानी व्यक्त केल्या आहेत.मांद्रे मतदार संघातील किनारे हळू हळू पर्यटकांनी फुलात असले तरी किनाऱ्यावर कोणतेच व्यवसाय सुरु केलेले नाहीत, पर्यटक येतील की नाही ही भीती व्यावसायिकांच्या मनात असल्याने व्यवसाय ठप्प आहे. बेरोजगारीही वाढण्याची शक्यता आहे शिवाय चोऱ्या वाढण्याची भीती आहे.

यंदा व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी कोरोना संसर्गाच्या अनेक अडचणी आहेत , आंतरराज्य प्रवास वाहतूक सुरु झाल्यामुळे थोडा आशेचा किरण दिसत आहे .

संबंधित बातम्या