गोवा: शिक्षण संचालकांनी घुमजाव करत आदेशात केली दुरुस्ती

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 26 एप्रिल 2021

शिक्षण संचालकांचा हा आदेश समाज माध्यमावर हास्यास्पद ठरला होता.

पणजी : सर्वत्र टीका होऊ लागल्यानंतर शिक्षण संचालकांनी घुमजाव करत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळांत हजेरी लावणे बंधनकारक असल्याच्या आदेशात दुरुस्ती करत पुढील सुचनेपर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेत येऊ नये असा आदेश जारी केला आहे. यापूर्वी कोविड प्रसार वाढल्याने शाळांत विद्यार्थ्यांना बोलावण्यास बंदी घालण्यात आली होती मात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत येणे सक्तीचे करण्यात आले होते. कोविड प्रसाराचा धोका असताना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घालत असल्याबद्दल सरकारवर टीका होऊ लागली होती.(Goa Director of Education amended the order)

गोवा: खात्याअंतर्गत डीवायएसपी होण्यासाठी द्यावी लागणार परीक्षा

शिक्षण संचालकांचा हा आदेश समाज माध्यमावर हास्यास्पद ठरला होता. अखेर शिक्षण संचालकांना आपल्या चुकीची जाणीव झाली असून त्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याना शाळेत न येण्यास मुभा दिली आहे. निकाल तयार करणे, शिकवणे, परीक्षा घेणे आदी कामे ऑनलाईन पद्धतीने पुर्ण करावीत असेही या आदेशात त्यांनी नमूद केले आहे. 

संबंधित बातम्या