Goa: अंजुणे धरणातून पाण्याच्या विसर्गाला सुरुवात; चारही दरवाजे खुले

दरम्यान या विसर्गाला सुरुवात केल्याने वाळवंटी नदीची ( river valvonti )पातळी वाढली आहे.
Anjunem Dam
Anjunem DamDainik Gomantak

पर्ये: गेल्या 24 तासात या भागात जोरावरपणे पाऊस झाल्याने सत्तरीतील अंजुणे धरण (anjunem dam in sattari taluka ) झपाट्याने भरले त्यामुळे आज दुपारी साडेतीन वाजता धरणातून पाण्याचा विसर्गाला सुरुवात केली आहे. आज धरणाची पातळी 91.27 मीटर झाल्यावर धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आणि पाण्याच्या विसर्गाला( releasing of water from dam reservoir ) सुरुवात केली. दरम्यान आज धरणाचे चारही दरवाजे खुले करून 21 क्युसेस प्रति सेकंद( 21 cubic litre per second ) या गतीने पाणी कयटी नदीतून वाळवंटीला सोडण्यात येत आहे. यासाठी दोन दरवाजे 10 से. मी. व दोन दरवाजे 15 सें. मी. खुले करून हे पाणी सोडले जात आहे. दरम्यान या विसर्गाला सुरुवात केल्याने वाळवंटी नदीची ( river valvonti )पातळी वाढली आहे.

अंजुणे धरणामुळे वाळवंटीच्या पुराचा वाढला

अंजुणे धरण हे नेहमी वाळवंटीच्या पुराचे कारण ठरत आहे. धरण भरल्यावर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातो. जर अशा वेळी या भागात जोरदार पाऊस झाल्यास आणि चोर्ला घाटातून वाहणाऱ्या वाळवंटीला मोठे पाणी आल्यास धरणाची कयटी नदी व वाळवंटी या दोन्ही नदीची पातळी वाढल्यावर नदीला पुराचा धोका वाढतो. पण आज जे वाळवंटी नदीला पूर आला त्याला मात्र अंजुणे धरणाचे पाणी नव्हते.

Anjunem Dam
Goa Monsoon Updates: कुशावतीला पूर, पारोडा पूल पाण्याखाली

दरम्यान अंजुणे धरणाची उच्च क्षमता पातळी ही 93.2 मीटर आहे. पण सुरक्षतेच्या कारणास्तव धरणाची पातळी 91 मीटर राखण्यात येते. कारण जर या भागात पाऊस झाल्यास आणि वाळवंटीची पातळी वाढल्यास धरणाचा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात येतो. त्यासाठी 2 मीटरची जागा कमी राखली जाते.

केरी जलसंसाधन कार्यालयात 24 तास कर्मचाऱ्यांची नेमणूक

दरम्यान आजपासून धरणातून पाणी सोडायला सुरुवात केल्याने धरणाच्या पाण्यावर निगराणी राखण्यासाठी केरी जलसंसाधन खात्याचे कर्मचारी( employees of water resources department ) वर्ग 24 तास ड्युटीला नियुक्ती केली आहे. पावसाच्या गतीवर आणि धरणाची पातळी पाहून धरणातून पाणी सोडले जाईल. अधिकारी वर्गाच्या मार्गदर्शनाखाली ही कर्मचारी वर्ग तैनात असणार आहे.

Anjunem Dam
Goa Floods: घरात पाणी घुसल्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

दरम्यान धरणात 3960 हेक्टर मीटर पाणी जमा झाले असून जलाशयात 80 टक्के पाणी भरले आहे. सद्य या भागात 2203 मी. मी. पाऊस झाला आहे. दरम्यान गेल्या तीन वर्षीप्रमाणे यंदाही जुलै च्या शेवटच्या आठवड्यात धरणातून पाण्याच्या विसर्गाला सुरुवात केली. यावरून धरण साधारणतः दोन महिन्यात भरते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com