गोव्यात रिव्होल्युशनरी गोवन्स संघटनेतर्फे निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात

Goa disinfection
Goa disinfection

खांडोळा: रिव्होल्युशनरी गोवन्स संघटनेतर्फे माशेल पंचक्रोशीत कोविडबाधितांच्या घरात, सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यास सुरूवात केली आहे. भोम, तिवरे, कुंभारजुवे, खांडोळा, गणेश नगर, सावईवेरे अशा ठिकाणी आवश्‍यकतेनुसार निर्जंतुकीकरण फवारणी केली. (In Goa, disinfection was started by the Revolutionary Govans Association)

रिव्होल्युशनरी गोवन्स संघटनचे कार्यकर्ते विश्‍वेश नाईक, तेजस देऊसकर, सचिन देऊसकर, सुरज फडते, मिलिंद फडते, विनय गावडे यांनी या निर्जंतुकीकरण मोहिमेत सहभाग घेतला. कोविड प्रतिबंधासाठी जे जे शक्य आहे, ते ते आम्ही करणार आहोत. गोवा कोविडमुक्त झाला पाहिजे. येथील ग्रामस्थांचे जगणे सुसह्य झाले पाहिजे, यासाठी सदैव कार्यरत आहोत, असे यावेळी या कार्यकर्त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, कोविड विरोधात लढण्यासाठी प्रत्येकाने एसओपीचे पालन करावे. नेहमी मास्क वापरावा, सॅनिटाझेशनचा वापर करावा, अनावश्यक फिरू नये. सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करावे. बाजारात गर्दी करू नये. शक्य होईल, तेवढी काळजी प्रत्येकाने घेतलीच पाहिजे. एकमेकांना सहकार्य करून आपण कोविडमुक्त गोवा निश्चितपणे करू शकतो. त्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्यांचीही गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com