Goa: कळंगुटात पुन्हा गोवा माईल्स आणि स्थानिक टॅक्सी चालकांमध्ये राडा

गोवा माईल्स कंपनीच्या पर्यटक गाड्यांचे चालक कळंगुटात विमानतळावरील पर्यटकांना कळंगुटात ड्रॉप केल्यानंतर परिसरात घुटमळत असतात.
Goa: कळंगुटात पुन्हा गोवा माईल्स आणि स्थानिक टॅक्सी चालकांमध्ये राडा
कळंगुटात बेकायदा भाडी मारण्यासाठी थांबलेल्या गोवा माईल्सच्या चालकाची विचारपूस करतांना मंत्री मायकल लोबो, सोबत स्थानिक पर्यटक टेक्सी चालक संतोष गोवेकर

शिवोली: गोवा माईल्स आणी स्थानिक पर्यटक (Local tourists) चालकांमधील गेले सहा महिने शमुं पाहात असलेला वाद काल पुन्हा एकदा उफाळून आला. यावेळी या वादात खुद्द कळंगुटचे आमदार तसेच मंत्री मायकल लोबो स्वता: सामिल झाल्याचे दिसून आले. दरम्यान, गोवा माईल्स कंपनीच्या पर्यटक गाड्यांचे चालक कळंगुटात विमानतळावरील पर्यटकांना कळंगुटात ड्रॉप केल्यानंतर परिसरात घुटमळत असतात. त्यांचप्रमाणे स्थानिक टॅक्सी (Taxi) चालकांच्या नाकावर टिच्चून कळंगुटातील भाडी मागतात अशा स्थानिक टॅक्सी चालकांच्या तक्रारी होत्या.

कळंगुटात बेकायदा भाडी मारण्यासाठी थांबलेल्या गोवा माईल्सच्या चालकाची विचारपूस करतांना मंत्री मायकल लोबो, सोबत स्थानिक पर्यटक टेक्सी चालक
Goa: युतीसाठी दारे उघडी, नाही झाल्यास आम्ही 40 मतदारसंघात लढण्यास तयार - चिदंबरम

दरम्यान, काल दुपारी असाच एक गोवा माईल्सचा पर्यटक गाडी चालक कळंगुटात पर्यटकांना ड्रॉप केल्यानंतर स्थानिक भाडे घेण्याच्या प्रतिक्षेत सेंट आलेक्स चर्च परिसरात घुटमळत असतांनाच  कळंगुटातील पर्यटक टॅक्सी चालकांनी त्यांना अडवले व त्याच्याशी हुज्जत घातली. दरम्यान, याचवेळी तेथून आपल्या ऑफीसकडे जाणाऱ्या स्थानिक आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांनी वाहतूक पोलिसांच्या हवाली केले. यावेळी वाहतूक नियमांचा भंग केल्याच्या कारणांवरून त्याला चलन देण्यात आले.

कळंगुटात बेकायदा भाडी मारण्यासाठी थांबलेल्या गोवा माईल्सच्या चालकाची विचारपूस करतांना मंत्री मायकल लोबो, सोबत स्थानिक पर्यटक टेक्सी चालक
Goa Taxi: डिजिटल मीटरमध्ये असणार ‘ॲप’प्रमाणेच सुविधा

यापुढे , गोवा माईल्सच्या गाडी चालकांनी बाहेरील पर्यटकांना ड्रॉप केल्यानंतर स्थानिक टॅक्सी वाल्यांच्या पोटावर पाय ठेवत बेकायदा भाडी न मारण्याचा त्याला इशारा दिला. सुदैवाने, मंत्री मायकल लोबो यांनी प्रकरणात स्वता: हस्तक्षेप केल्याने त्या गोवा माईल्स चालकाला स्थांनिकांचा प्रसाद मिळण्यापासून वाचवले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com