Goa: वाळपई महिला काँग्रेस तर्फे गांजेत आवश्यक वस्तूंचे वितरण

वाळपई महिला काँग्रेस (Walpai Women's Congress) तर्फे गांजे येथे पूरग्रस्तांना आवश्यक सामानाचे वितरण करण्यात आले.
Goa: वाळपई महिला काँग्रेस तर्फे गांजेत आवश्यक वस्तूंचे वितरण
Walpai Women's CongressDainik Gomantak

वाळपई महिला काँग्रेस (Walpai Women's Congress) तर्फे गांजे येथे पूरग्रस्तांना आवश्यक सामानाचे वितरण करण्यात आले. गांजे परिसर पुराच्या वेढ्यात सापडला होता. गांजेतील सत्तावीस कुटुंबाचे संसार उघड्यावर पडले आहेत त्या सर्व कुटुंबाना वाळपई महिला काँग्रेस तर्फे मदत करण्यात आली. यावेळी वाळपई गट काँग्रेस अध्यक्ष दशरथ मांद्रेकर, वाळपई महिला काँग्रेस अध्यक्ष राेशन देसाई , संजय गावडे व शंकर नाईक यांची उपस्थिती होती.

पुरग्रस्तांतील सत्तावीस कुटुंबाना आवश्यक सामान देण्यात आले. वाळपई महिला काँग्रेस अध्यक्ष राेशन देसाई यांनी माहिती देताना सांगितले की वाळपई मतदारसंघात सुमारे तीनशे पेक्षा जास्त कुटुंबे पुरामुळे उघड्यावर आली आहे. वाळपई काँग्रेस विविध प्रकारे लाेकांना मदत करीत आहे. आतापर्यंत वाळपई मतदारसंघातील १८० घरापर्यंत वाळपई काँग्रेस तर्फे मदत पाेहाेचली असुन वाळपई मतदारसंघातील सर्व घरापर्यंत मदत काँग्रेस पाेहाेचवणार आहे.

Walpai Women's Congress
Goa: कंत्राटदाराच्या अक्षम दुर्लक्षामुळे वाळपाई- फोंडा रस्त्याची वाताहत

वाळपई गट काँग्रेस अध्यक्ष दशरथ मांद्रेकर (Dasharath Mandrekar) यांनी माहिती देताना सांगितले की वाळपई काँग्रेस तसेच महिला काँग्रेस पुरग्रस्तांना करीत असलेली मदत हि समाज भावनेतून करीत असुन त्या स्थानिक आमदाराने लाेकांत गैरसमज करणे टाळावे व आपले काम करावे. स्थानिक आमदाराने फक्त दाैरे आणि पाहाणी करणे बंद करावे व पुरग्रस्तांची वस्तुस्थिती जाणून घ्यावी असा सल्ला स्थानिक आमदाराला दिला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com