छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 'अश्लील टिप्पणी' केल्याबद्दल गोव्यातील डीजेला अटक

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सोशल मीडियावर 'अश्लील टिप्पणी' केल्याबद्दल गोव्या पोलिसांनी सोमवारी 32 वर्षीय डीजे नैकेलिस नोरोन्हा यांना अटक केली. 

शिवोली: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल फेसबुक या संकेत स्थळांवर वादग्रस्त तसेच अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल शिवोलीतील नेक्लीस नोरोन्हा याला  हणजुण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. स्थानिक समर्थन संघटणेचे अध्यक्ष प्रेमानंद आरोलकर यांच्याकडून याबाबतीत हणजुणच्या पोलिसांत रितसर तक्रार रविवारी दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, तारची भाट शिवोलीत वास्तव्य करून राहणारा संशयित नोरोन्हा व्यावसायाने डीजे असून आपल्या विरोधात पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीची दखल घेत त्यांने तात्काळ फेसबुकवरील पोस्ट डिलीट केल्याचे समजते. दरम्यान, शिवाजी महाराजाबद्दल अपमानास्पद टिपण्णी व्हायरल होताच काणकोण पासून पेडणेतील शिवप्रेमीं संतापुन उठले. त्यांनी कारवाईसाठी सरकारवर दबाव आणला. संशयित नोरोन्हा यांच्या विरोधात गोव्यातील वेगवेगळ्या पोलिस स्थानकात एकुण सहा तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. हणजुण पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत रविवारी रात्री संशयित नेक्लीस नोरोन्हा याच्या तारचीभाट शिवोलीतील राहात्या घरातून मुसक्या आवळल्या. पुढील तपास उपनिरीक्षक  अक्षय पार्सेकर करीत आहेत.

मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सोशल मीडियावर 'अश्लील टिप्पणी' केल्याबद्दल गोव्या पोलिसांनी सोमवारी 32 वर्षीय डीजे नैकेलिस नोरोन्हा यांना अटक केली. ही माहिती एका अधिकृत निवेदनात दिली आहे. गोवा पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रेमानंद नावाच्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे नोरोन्हा यांना उत्तर गोव्यातील शिवोली गावातून अटक केली गेली.

आरोपी नरोन्हा यांनी शिवाजी महाराजांबद्दल फेसबुकवर अश्लील टीका केली होती ज्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. असा आरोप प्रेमानंद यांनी तक्रारीत करतांना केला आहे. नोरोन्हा सध्या पोलिस कोठडीत आहे आणि त्याच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) 295 ((ए) (धार्मिक भावना दुखावण्या) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

चार दिसांपुर्वीच गोव्यात दणक्यात शिवजयंती साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 19 फेब्रुवारी रोजी देशभरात शिवजयंती साजरी झाली. राज्यातील कोरोनाची स्थिती बघता सरकारकडून शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.

दरम्यान मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथेही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा वाद वाढत आहे. मूर्ती हटविण्याच्या विरोधात लोकांनी महामार्ग रोखला आणि पालिकेला निवेदनही दिले आहे. त्यानंतर आता पालिकेतर्फे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी नवीन जागेचा शोध घेण्यात येत आहे. यातच गोव्यात हा प्रकार घडला आहे.

संबंधित बातम्या