Floods Effect: दरडी कोसळल्‍याने दुधाचे टँकर माघारी; गोमंतकीयांची निराशा

बेळगाव आणि महाराष्ट्रातील पुरवठ्यावर प्रचंड परिणाम झाला असून गोव्याकडे पुरेसे दूध उपलब्ध होत नाही.
Floods affect milk supply in Goa
Floods affect milk supply in GoaDainik Gomantak

पणजी : महापुराच्या (Floosds) संकटामुळे घाटातील वाहतूक खोळंबली. ही वाहतूक अजूनही सुरळीत झालेली नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या दुधाची (Milk) टंचाई गोव्याला (Goa) भासत आहे. सोमवारी पणजीत काही डेअरी आणि दुकानांमध्ये सकाळी 11 वाजताच दूध संपल्याचे घोषित करण्यात आले. दुपारी दूध न मिळाल्याने ग्राहकांची निराशा झाली. (Goa does not have milk Due to impact on milk supply in Belgaum and Maharashtra)

गेल्या काही दिवसांपासून गोव्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. राज्याला पुराचा जबर फटकाही बसला. त्यामुळे रस्ते आणि लोहमार्गही बंद पडले आहेत. आंबोली, अनमोड घाटातील वाहतूक सुरळीत न झाल्यामुळे गोव्यात दररोज येणारे दुधाचे टॅंकर पोहोचू शकले नाहीत. 23 व 24 रोजी काही टॅंकर्स परत गेले. त्यामुळे सध्या गोमंतकीयांना गोवा डेअरीच्या दुधाचा आधार बनला आहे. बेळगाव आणि महाराष्ट्रातील पुरवठ्यावर प्रचंड परिणाम झाला असून आमच्याकडे पुरेसे दूध उपलब्ध होत नाही, असे पणजीतील एका दूध विक्रेत्याने सांगितले.

Floods affect milk supply in Goa
Goa: धोकादायक असूनही पदपूलावरून वाहतूक

गोवा डेअरीच्या विक्रीत वाढ

गोवा डेअरीच्या दूध विक्रीत कमालीची वाढ झाली असून सोमवारी त्यांनी 75 हजार लिटर्स दुधाची विक्री केली. रविवारी हाच आकडा 59 हजार लिटर्स, तर शनिवारी 63 हजार लिटर्स एवढा होता. गोवा दूध उत्पादकांकडून साधारण 50 ते 52 हजार लिटर्स दुधाचा पुरवठा केला जातो. अन्य सुमारे 20 हजार लिटर्स दूध कर्नाटकातून आणले जाते. यावर्षी महाराष्‍ट्रातून एकही दुधाचा पुरवठा करणारी निविदा न आल्याने कर्नाटक राज्यातील निविदा स्‍वीकारण्यात आल्या. त्यामुळे 20 हजार लिटर्स दूध आयात केले जाते.

अजूनही परराज्यावर अवलंबून

जवळपास 15 लाख लोकसंख्येच्या राज्यात दररोज 1 लाख लिटर्सहून अधिक दुधाची मागणी असते. एवढ्या मोठ्या प्रमाणात येथे दुधाच पुरवठा नसल्यामुळे परराज्यांतील दुधावर गोमंतकीयांना अवलंबून राहावे लागते. अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीच्या काळात लोकांची गैरसोय होते. त्यामुळे गोवा अजूनही याबाबत परावलंबी असल्याचे स्पष्ट होते.

Floods affect milk supply in Goa
Goa: सर्व मोफत, मग दिल्ली सरकार केंद्राकडे मदत का मागते?

"पुरामुळे अन्य दूध गोव्यात आले नसल्याने, गोवा डेअरीचे दूध सगळ्यांपर्यंत पोहोचविण्‍याचा आमचा प्रयत्न आहे. आवश्यक त्या ठिकाणी गोवा डेअरीचे दूध पोहोचविण्यासाठी डेअरीच्या विविध कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे. व्यवस्थापकीय समितीही सध्या अविरत कार्यरत आहे."

- दुर्गेश शिरोडकर, अध्यक्ष - व्यवस्थापकीय समिती गोवा डेअरी

"आम्ही दररोज 400 लिटर्स दूध विकतो. त्यातील बहुतांश दूध हॉटेल्सना जाते. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून आम्हाला पुरवठा होत नाही. त्यामुळे आमचे दररोजचे ग्राहकही परत जात आहेत. दूध नसल्यामुळे आमच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. आम्हाला आता गोवा डेअरीकडून अधिक दूधाची मागणी करावी लागत आहे."

- चंद्रकला विठोबा नाईक, दुधविक्रेत्या, सांतिनेज

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com