गोव्यात आजपासून घरगुती सिलिंडर 50 रुपयांनी महागणार

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

पेट्रोल व डिझेल तसेच स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरचे दर सामान्य माणसाला जीवघेणे ठरू लागले आहेत. आजपासून सिलिंडरच्या दरात पन्नास रुपयांनी वाढ झाली, तर, पेट्रोल व डिझेलचे दरही शंभरीकडे झेपावताना आढळत आहेत.

पणजी : पेट्रोल व डिझेल तसेच स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरचे दर सामान्य माणसाला जीवघेणे ठरू लागले आहेत. आजपासून सिलिंडरच्या दरात पन्नास रुपयांनी वाढ झाली, तर, पेट्रोल व डिझेलचे दरही शंभरीकडे झेपावताना आढळत आहेत. सिलिंडरचा दर आता 783 रुपये झाला आहे.
दिवसागणिक इंधनाचे, पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच चालले आहेत. राजधानी पणजी शहरात आज पेट्रोलचा दर 87 रुपये 1 पैसा होता.

काणकोणमधील पाळोळे समुद्रकिनार्‍यावर पाण्याने भरती रेषा ओलांडली; पाणी पातळीत अचानक वाढ

90 रुपये व 90 पैसे प्रतिलीटर या दराने स्पीड पेट्रोल विकले जात होते. डिझेलचा दर लिटरमागे 83 रुपये 74 पैसे होता. भाजपचे सरकार 2012 मध्ये सत्तेत आले, तेव्हा देशातील सर्वात कमी पेट्रोल वरील मूल्यवर्धित कर 0.01 टक्के करण्यात आला होता. या कारणामुळे पेट्रोलचे दर 60 रुपये प्रति लिटर झाले होते. गोवा राज्य सरकारने पेट्रोलचा दर 65 रूपये प्रतीलिटरच्या वर नाही जाणार असे सांगितले होते. परंतु, सरकार सोयिस्कररित्या हे आश्वासन विसरले आणि पेट्रेलचे दर चढतेच राहिले. 

"मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी केलेली घोषणा फार्सचं"

आता पणजीत सध्या 87 रुपये प्रतीलिटर हा पेट्रोलचा दर आहे. पणजीत सध्या पेट्रोलचा दर 87.1 रूपये प्रतीलिटर इतका आहे. सिलिंडरच्या भावात फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यातच दोनवेळेस वाढ करण्यात आली आहे. चार फेब्रुवारी रोजी 25 रुपयांनी आणि आजपासून 50 रुपयांनी वाढ करण्यात आली. म्हणजेच 75 रुपयांची दरवाढ नागरिकांना सहन करावी लागणार आहे. गेले सहा महिने हे अनुदान जमा करण्यात आले नसल्याचे गोवा कॅन संघटनेचे रोलंड मार्टिन्स यांनी सांगितले.

संबंधित बातम्या