Goa: रस्त्यावरून गावची बदनामी नको

सुर्लातील नागरिकांची मागणी
Goa: रस्त्यावरून गावची बदनामी नको
Citizens of Surlem Panchayat (Goa)Dainik Gomantak

Goa: डिचोली, सुर्ल पंचायत क्षेत्रातील (Bicholim, Surlem) मडकईकर वाड्यावर जाण्यासाठी धड रस्ता नाही. अशा आशयचा जो व्हिडीओ व्हायरल (Viral Video of Bad roads) होत आहे. तो वस्तूस्थितीला अनुसरून नाही. उलट गावचे नाव बदनाम करणारा आहे. असा दावा सुर्लवासियांनी करून या प्रकाराचा निषेध केला आहे. बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करावी. अशी मागणी माजी सरपंच मंगलदास उसगावकर यांनी केली आहे. साखळीचे आमदार डॉ प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant) यांच्यामुळेच आमची प्रलंबित स्वप्नपूर्ती झाली असून, मडकईकर वाड्यावरील प्रत्येकाच्या दारापर्यंत वाहने जात आहेत. अशी माहिती स्थानिक नागरिकांनी पत्रकार परिषदेत दिली.

Citizens of Surlem Panchayat (Goa)
Goa: धारगळ दोन खांब; सुशोभीकरण की कचरा दर्शन ?

गेल्या रविवारी काही युवक मडकईकर वाड्यावर आले होते. या युवकांनीच हे कृत्य केल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. या पत्रकार परिषदेस सरपंच चंद्रकांत घाडी, उपसरपंच अनिता कुंडईकर, स्थानिक पंच कृष्णा बायेकर, भोला खोडगीणकर, सुंदर मडकईकर, भालचंद्र कालेकर,राजेंद्र मडकईकर, वंजीता केलेकर, लक्ष्मी मडकंईकर, शोभा मडकईकर आणि अन्य स्थनिक महिला उपस्थित होत्या.

बाये-सुर्ला येथील मडकईकर वाड्यावरील जनतेची रस्त्याची मागणी प्रलंबित होती. स्थनिक आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी स्थानिक जमीन मालकांना विश्वासात घेऊन मडकईकर वाड्यावर रस्ता उपलब्ध करून दिला आहे. आज या वाड्यावरील प्रत्येकाच्या घरापर्यंत गाडी जात आहे. आपत्कालीनवेळी रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची गाडीही या ठिकाणी पोचत आहे. असे असताना विरोध म्हणून चुकीची माहिती व्हायरल करणे. कितपत योग्य आहे. असा प्रश्न स्थनिक पंच कृष्णा बायेकर यांनी व्यक्त केला आहे.

Citizens of Surlem Panchayat (Goa)
Goa: पिळगावच्या राजकारणात राजकीय हस्तक्षेप, सरपंच गटाने केला दावा

पायवाटेचा झाला रास्ता

गेली अनेक वर्षे या वाड्यावर येण्यासाठी धोकादायक अशी पायवाट होती. पावसाळ्यात तर या वाड्यावर जाणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत असे. ओहोळ भरला, वाड्यावरील जनतेचा अन्य भागांशी संपर्क तुटायचा. मुलांना धड शाळेत जायला मिळत नसे. आपत्कालीन संकटाच्या वेळी मोठी समस्या निर्माण होत असे. आजारी व्यक्तींना तर उचलून मुख्य रस्त्यावर आणावे लागत असे. मात्र आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी या समस्या लक्षात घेऊन लोकांची मागणी पूर्ण केली आहे. अशी माहिती सुंदर मडकईकर यांनी दिली.

गावची बदनामी नको

सोशल मीडियावर सारख्या व्यासपीठाचा काही टवाळखोर चुकीचा उपयोग करताना दिसतात. त्यात नकळत कोणत्याही गावात येऊन काहीच माहिती नसताना तेथील चुकीची माहिती प्रसिद्ध करून, गावचे नाव बदनाम करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. अशा प्रकारा विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी पंचायत मंडळाने ठेवावी. आमच्या गावात कुठे काय करायचे ते आम्ही ठरवण्यास समर्थ आहोतn तेव्हा बाहेरच्या लोकांनी येऊन आम्हाला शहाणपणा शिकवू नये. आणि विनाकारण चुकीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल करू नये. असे सुर्ल गावचे सरपंच चंद्रकांत घाडी यांनी स्पष्ट केले. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा त्यांनी दिला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com