Goa Double Tracking: मडगाव- सावर्डे दुपदरी रेल्वे मार्गाची 23 रोजी चाचणी

रेल्वे सुरक्षा मंडळ आयुक्तांच्या देखरेखीखाली 120 किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वे इंजिन चालवले जाणार
Goa Double Tracking: मडगाव- सावर्डे दुपदरी रेल्वे मार्गाची 23 रोजी चाचणी
Railway Goa Double TrackingDainik Gomantak

Goa Double Tracking: दक्षिण मध्य रेल्वेच्या (South Central Railway) मडगाव ते सावर्डे (Margao To Sanvardem) दरम्यानच्या 15 किलोमीटर दुपदरी मार्गाची 23 सप्टेंबर रोजी चाचणी (Railway Double Tracking Test) घेतली जाणार आहे. रेल्वे सुरक्षा मंडळ (Railway Safety Board) आयुक्तांच्या देखरेखीखाली ही चाचणी घेतली जाणार असून 120 किलोमीटर प्रतितास (120 Km/Hr) या वेगाने या मार्गावरून रेल्वे इंजिन चालवीत नेले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Railway Goa Double Tracking
Goa: राष्ट्रीय महामार्ग - 17 B वरील दुभाजक तोडून केला रस्ता

या दुपदरीकरणाला सासष्टी तालुक्यातून प्रचंड विरोध झालेला असतानाही रेल्वेने हे काम पूर्ण केले होते. या मार्गाला रस्ता वाहूतुकीची अडचण होऊ नये यासाठी या मार्गादरम्यान आठ अंडरपास आणि ओव्हरब्रिजही बांधण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. मडगाव - सावर्डे दुपदरीकरण पूर्ण झाले असले तरी मडगाव वास्को दरम्यानचे काम अजून अपूर्ण असून कासावली येथे या मार्गाला अजून विरोध चालू आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com