Drama Competition : महाराष्ट्र राज्‍य हौशी नाट्यस्पर्धा; गोव्याचे ‘इनफिल्ट्रेशन’ नाटक ठरले अव्वल

‘वार्ता वार्ता वाढे’ द्वितीय तर ‘नात्याची गोष्ट’ तृतीय
Infiltration Drama
Infiltration DramaDainik Gomantak

61व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत उगवे-पेडणे येथील रसरंग संस्थेच्या ‘इनफिल्ट्रेशन’ या नाटकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्‍त झाले.

पुणे नाट्यसंस्कार कला अकादमी संस्थेच्या ‘वार्ता वार्ता वाढे’ या नाटकास द्वितीय तर मुंबईतील चारकोप कल्चरल ॲण्‍ड स्पोर्टस्‌ फाऊंडेशनच्या ‘नात्याची गोष्ट’ या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले.

अंतिम फेरीत एकूण 39 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. ‘इनफिल्ट्रेशन’साठी उत्कृष्ट दिग्दर्शन तसेच उत्कृष्ट प्रकाशयोजनेसाठी नीलेश महाले यांना तर उत्कृष्ट स्त्री कलाकार म्हणून डॉ. वेदिका वाळके यांना रौप्यपदक प्राप्त झाले.

Infiltration Drama
Goa Saras Festival : सरस’मध्ये बेकायदा व्यवहार नकोच

मयूर मयेकर व तर अमोघ बुडकुले यांना अभिनयासाठीचे गुणवत्ता प्रमाणपत्र, ‘एक रिकामी बाजू’मधील (गोवा) डॉ. संस्कृती रायकर यांना अभिनयासाठीचे रौप्यपदक लाभले. परीक्षक म्हणून संयुक्ता थोरात, वासुदेव विष्णुपुरीकर, रवींद्र अमोणकर, राज कुबेर आणि सुरेश गायधनी यांनी काम पाहिले.

दिग्‍दर्शनातही गोव्‍याने मारली बाजी

दिग्दर्शन : नीलेश महाले (इनफिल्ट्रेशन), नेपथ्य : सचिन गावकर (निर्वासित), प्रकाशयोजना : नीलेश महाले (इनफिल्ट्रेशन), रंगभूषा : वासुदेव आंब्रे (हासपर्व), संगीत दिग्दर्शन : यशराज आवेकर (संगीत दहन आख्यान), उत्कृष्ट अभिनय (पुरुष) : नीलेश भेरे (मिशन व्हिक्टरी), स्त्री कलाकार : स्‍मितल चव्हाण (निर्वासित), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र - स्त्री कलाकार : अश्विनी तडवळकर (तेरे मेरे सपने), पुरुष कलाकार : अमोघ बुडकुले (एक रिकामी बाजू).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com