GOA: समुद्राचे पाणी विहीरीत गेल्याने गोंयकारांचे पिण्याच्या पाण्याचे हाल

GOA The drinking water is getting worse due to the sea water going into the well
GOA The drinking water is getting worse due to the sea water going into the well

पेडणे : देवसू येथील शेतीत व तेरेखोल नदीच्या(River) जवळ असलेल्या भागात समुद्राचे(Ocean) पाणी शिरल्याने येथील लोकांना स्वयंपाकाच्या पाण्यावाचून(Water) हाल सोसावे लागत आहेत. शिवाय शेती मळे व तळ्या असलेल्या जवळच्या विहिरींच्या पाण्यात हे समुद्राचे पाणी झिरपल्याने विहीरींचे(Well) पाणी मचुळ झाले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर(Drinking water) स्वयंपाकाची चव बदलून ते बेचव लागत आहे. (GOA The drinking water is getting worse due to the sea water going into the well)

तळ्यात थेट समुद्राचे पाणी शिरल्याने गोड्या पाण्यातील मासळी मृत पावली आहे. खारेपाणी मिश्रित असे पाणी पिल्याने व स्वयंपाकासाठी वापरल्याने आरोग्यावर त्यांचा अनिष्ट परिणाम तर होणार नाही ना, या विचाराने नागरिक चिंतेत आहेत. 

तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी सामान्य अशी असले तरी आणि शेती मळ्यात घुसलेल्या समुद्राच्या पाण्याची पातळी कमी झाली असली तरी शेती मळ्यात छातीभर पाणी अद्याप आहे. तर भरतीवेळी आणखीन वाढते. देवसू येथे वायंगण व जवळच शेतीचा मोठा मळा आहे. या शेतीच्या मळ्याला बांध आहेत. या बांधावर माड आहेत. काही थोडेफार शेतकरी बागायतीही करतात. अशाप्रकारे खारे पाणी घुसल्याने माड, बागायती मरुन जाण्याची शक्यता आहे. जमीन नापीक होण्याची शक्यता काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, खारे पाणी गोड्या पाण्याच्या तळ्यात शिरल्याने तळ्यातील बरीच मासळी मृत पावली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com