ड्रोनद्वारे खत, किटकनाशक फवारणी; कृषी क्षेत्रात गोव्याची उत्क्रांती

डॉन बॉस्को अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा अभिनव प्रकल्प
Drone
Drone Dainik Gomantak

फातोर्डा येथील डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयातील (Don Bosco Engineering Collage) माजी विद्यार्थी जे सद्या उलवन एग्रीटेक सर्विसिस (Ulavan Agritech services) कंपनीत कार्यरत आहेत त्यांनी शेतात किंवा कृषि क्षेत्रात खत व किटकनाशक औषधांचा फवारा मारण्यासाठी ड्रोन तयार केला असुन हा एक कृषी क्षेत्राक उत्क्रांती घडविणारा प्रकल्प आहे.

डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयात दशकपुर्ती निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत हा ड्रोन प्रदर्शनार्थ ठेवला होता. या ड्रोन संबंधीची माहिती या प्रकल्पाकडे संबंधीत अक्षय सराफ, राजदत्त केंकरे, आदित्य परब, रविंद्र नायक, शिवलय नायक यानी दिली.

उलवन कंपनीची स्थापना केल्यास दोन वर्षे पुर्ण झाली व तरुण कृष्णकुमार हे या कंपनीचे संस्थापक असल्याची व ही कंपनी कृषि क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानपुरक सेवा देण्यात तत्पर असल्याची माहिती त्यानी दिली.

Drone
महाविद्यालायच्या मागच्या दहा वर्षातील प्रगतीमुळे अभिमान; संचालक फा. किन्ले डिक्रुझ
ड्रोन संबंधीची माहिती देताना अक्षय सराफ, राजदत्त केंकरे, आदित्य परब, रविंद्र नायक, शिवलय नायक
ड्रोन संबंधीची माहिती देताना अक्षय सराफ, राजदत्त केंकरे, आदित्य परब, रविंद्र नायक, शिवलय नायकDainik Gomantak

हा ड्रोन तयार करण्यास दोन वर्षे लागली. या ड्रोनची बांधणी अशा पद्धतीने करण्यात आली आहे जेणेकरुन एक एकर जमीनीवर फवाऱ्यासाठी केवळ दहा मिनिटे लागतात. शिवाय मनुष्यबळाचाही जास्त वापर होत नाही.

एखाद्या शेत जमिनिची फवारणी करण्यासाठी या ड्रोनला दिशा दिली जाते व केवळ तो ऑपरेट करण्यासाठी एका व्यक्तीची गरज भासते, अशी माहिती यावेळी देण्यात आली. सद्या केवळ एकच ड्रोन असल्याने गोव्यात त्याला भरपुर मागणी येत आहे. अशाच प्रकारचे आणखी ड्रोन तयार करण्याचा विचार असल्याचे त्यानी सांगितले.

Drone
Goa Election: रणजीचे माजी कर्णधार रॉबीन डिसोजा काँग्रेसमध्ये

एक ड्रोन 500 फुट पर्यंत वर जाऊ शकतो त्यामुळे नारळाच्या माडावर पर्यंत जाऊन किटकनाशक औषधांचे फवारे करता येतात असेही त्यांनी सांगितले. शिवाय या ड्रोन द्वारे आरोग्य कर्मचाऱ्यांना घराघरांनी जाऊन डेंग्यु किंवा मलेरियाचे जंतु नष्ट करण्यासाठी किटकनाशक औषधांचे फवारे करता येतात. त्यासाठी लहान आकाराचे ड्रोन तयार करता येतात अशी माहितीही या वेळी देण्यात आली.

अशा ड्रोनचे मार्केटिंग करण्याचा कंपनीचा विचाराधीन असुन त्यासाठी प्रयत्न चालु असल्याचे त्यानी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com