Goa Crime : गोव्यात वाढतोय ड्रग्जचा प्रसार! अमेरिकन ड्रग्स सप्लायरला अटक

नुकतेच हणजूण येथून क्राईम ब्रांचने गिओंट कासो या अमेरिकन नागरिकाला ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक केली.
Goa Drugs News
Goa Drugs NewsDainik Gomantak

गोव्यात अमली पदार्थांचे जाळे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गोवा पोलीस प्रशासन आणि अबकारी खाते सतर्क असूनही देश-प्रदेशातील अमली पदार्थांचे डीलर खुलेआम गोव्यात ड्रग्जचा धंदा करताना दिसत आहेत.

नुकतेच हणजूण येथून क्राईम ब्रांचने गिओंट कासो या अमेरिकन नागरिकाला ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्याच्याकडूनपोलिसांनी 12 लाखांचा एलएसडी आणि एमडीएमए जप्त केला आहे.

तर दुसरीकडे, करासवाडा म्हापसा येथून डायगो डीकॉस्टा या स्थानिक नागरिकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे 2.6 लाखांचे एमडीएमए आणि हशीश ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या दोन्ही घटनांचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी, धुळेर-म्हापसा येथे अंमलीपदार्थविरोधी पथकाने काल सकाळी 9 च्या सुमारास सापळा रचून कामुर्ली-बार्देश येथील फैयाझ बाबूसाब नडाफ या तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून एक किलो गांजा व 120 ग्रॅम हशिश तेल जप्त केले. या अंमलीपदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे 2.20 लाख रुपये असल्याची माहिती या कक्षाचे उपअधीक्षक नेर्लोन अल्बुकर्क यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com