
Drugs Import From Karnataka-Maharashtra: दोन दिवसांपूर्वी कुडचडे येथे सामोसा विकणाऱ्या युनूस माताजी याला अटक करून 35 हजारांचे हॅश ऑईल जप्त केल्यामुळे गोव्यातील ग्रामीण भागातही आता अमली पदार्थ बिनदिक्कतपणे पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे.
गाेव्यात मुख्यत: चरस आणि गांजाचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. चरस मुख्यत: हिमाचल प्रदेश, नेपाळ आणि उत्तर भारतीय राज्यांतून येतो, तर गांजा हा झारखंड, ओडिशा येथून कर्नाटक, महाराष्ट्र मार्गे गोव्यात आणला जातो.
दिवसेंदिवस हा ड्रग्सचा विळखा घट्ट होत चालला आहे. हल्लीच पोलिस समन्वय समितीची ऑनलाईन पद्धतीने बैठक झाली. त्यावेळी ही माहिती उघड झाली.
गोमंतकीयांचा शिरकाव
गोव्यात आतापर्यंत जे ड्रग पेडलर्स पकडले आहेत त्यापैकी बहुतेकजण हे ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल येथील असले तरी आता या व्यवसायात गोमंतकीय तरुणही मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत.
यावर्षी जून महिन्यापर्यंतची जी आकडेवारी हाती आली आहे, त्यात अटक केलेल्या ८९ पेडलर्सपैकी ५३ जण अन्य राज्यांतील, तर २५ जण गोमंतकीय आहेत. या सहा महिन्यांत ११ विदेशींना ड्रग्स तस्करीप्रकरणी अटक केली आहे.
"गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणांहून ड्रग्स येते. गोवा हे ड्रग्स उत्पादन करणारे राज्य नाही. येेथे फक्त बाहेरून आलेले ड्रग्स विकले जातात." "ड्रग्स माफियाचा नामोनिशाण संपविण्यासाठी गोवा पोलिस वेगवेगळ्या माध्यमांतून प्रयत्न करत आहेत. हल्लीच जे इटालियन डिजे गाेव्यात ड्रग्स विक्रीसाठी घेऊन आले होते, त्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्यांच्याकडून ५० लाखांचे ड्रग्स जप्त केले."
बॉस्युएट सिल्वा, अधीक्षक, अमली पदार्थविरोधी विभाग.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.