गोव्यात हवालाप्रकरणी ‘ईडी'चे छापे

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 6 मार्च 2021

हवालाप्रकरणी मुंबई व गोवा येथे असलेल्या सेटे मारेस ग्लोबल फॉरेक्स प्रायव्हेट लिमिटेड व नेमीचंद खेमराज फोरेक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विविध ठिकाणी असलेल्या कार्यालयांवर छापे टाकले.

पणजी : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) गोवा विभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी हवालाप्रकरणी मुंबई व गोवा येथे असलेल्या सेटे मारेस ग्लोबल फॉरेक्स प्रायव्हेट लिमिटेड व नेमीचंद खेमराज फोरेक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विविध ठिकाणी असलेल्या कार्यालयांवर छापे टाकले. त्यातील कार्यालय बाणावली येथे आहे.

या छाप्यावेळी भारतीय व विदेशी चलनासह मोठ्या प्रमाणात ऐवज जप्त करण्यात आला. परदेशी विनिमय व्यवस्थापन अधिनियम (फेमा) अंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई करताना हवालाची कागदपत्रे, कार्यालयातील लॅपटॉप व मोबाईल फोन याच्यासह रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. जप्त भारतीय व देशी चलनाची किंमत सुमारे 54 लाख रुपये आहे. याव्यतिरिक्त 44.37 लाख रुपये रोख जप्त केले आहेत.

विविध विदेशी चलनाच्या नोटा जप्त केल्या आहेत त्याची किंमत सुमारे 9.55 लाख रुपये आहे. या कंपन्या परकीय चलन विनिमयाच्या व्यवसायात गुंतल्या आहेत. दैनंदिन तत्त्वावर या एफएफएमसींद्वारे बँक खात्यात मोठ्या प्रमाणात रोख जमा केली जाते व त्यानंतर ती आरटीजीएस अथवा एनईएफटीमार्फत अन्य एफएफएमसीकडे पाठविली आणि परकीय चलन जमा केले ज्यामुळे या कंपन्यांविरूद्ध संशय निर्माण झाला होता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

''मडगाव पालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार''

संबंधित बातम्या