11 व 12 वी परीक्षा ‘ऑफलाईन’

गोवा शिक्षण खात्याचे परिपत्रक : उच्च माध्यमिक शाळांना अनुमती
11 व 12 वी परीक्षा ‘ऑफलाईन’
Goa Education Board Decision 11th and 12th exams offlineDainik Gomantak

पणजी: राज्यातील उच्च माध्यमिक शाळांकडून (Goa Board) अकरावी व बारावीची (12th) परीक्षा ऑफलाईन (offline) पद्धतीने घेण्यासाठी शिक्षण खात्याने (Education Department) अनुमती दिली आहे. अनेक शाळांकडून परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याच्या आलेल्या विनंत्या व शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण संचालक भूषण सावईकर यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

गेल्यावर्षी मार्च 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या कोविड साथीच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.

खबरदारी अन॒ उपाययोजना

1 लसीकरणाचे डोस घेतलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेच्या आवारात प्रवेश दिला जावा. ज्यांच्याकडे दोन्ही डोस घेतले असल्याचे प्रमाणपत्र नाही त्यांना आरटीपीसीआर चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगावे.

Goa Education Board Decision 11th and 12th exams offline
Goa: तंबाखू विरोधी जाहिरातींना बंदी

2 विद्यार्थ्यांच्या परीक्षेवेळी प्रत्येक वर्गामध्ये बसण्याची क्षमता असलेल्यापैकी ५० टक्के विद्यार्थ्यांचाच समावेश करण्यात यावा. शाळेच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक शिक्षक व विद्यार्थ्याच्या शरीरिक तापमानाची तपासणी केली जावी.

Goa Education Board Decision 11th and 12th exams offline
राज्यपाल भवन सर्वसामान्यांसाठी खुले: राज्यपाल पिल्लई

3 ज्या विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास त्यांची त्वरित चाचणी घेण्यात यावी. कोरोनाचे प्रमाण वाढू नये यासाठी शाळांनी आवश्‍यक ती खबरदारी तसेच उपाययोजना कराव्यात असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.