CM Pramod Sawant: सरकारी नोकरीचा हट्ट नको; कौशल्यावर भर द्या

साखळीत पद्मिनी फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांचा गौरव
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak

CM Pramod Sawant आज सरकारी नोकरीच हवी हा हट्ट न धरता आदरातिथ्य, पर्यटन, आरोग्य, योग शिक्षक अशा चौफेर क्षेत्रात हजारो संधी उपलब्ध आहेत. वैद्यकीय, आयुर्वेदिक व इतर क्षेत्रात अनेक विभागात शेकडो तंत्रज्ञान तज्ज्ञ हवे आहेत.

त्यासाठी साई नर्सिंग व इतर माध्यमातून अनेक स्वरूपाचे अभ्यासक्रम साखळी भागात सुरू आहेत. त्याअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यास शंभर टक्के रोजगार उपलब्ध होत आहेत.

त्यामुळे युवा पिढीने निराश न होता नवनवीन तंत्र कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा. तसेच इतरांनाही प्रेरणा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

साखळी येथे पद्मिनी फाउंडेशनतर्फे मतदारसंघातील गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे येथील रवींद्र भवनात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर सुलक्षणा सावंत, पांडुरंग सावंत, नगराध्यक्ष रश्मी देसाई, आमदार गणेश गावकर, आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर इतर नगरसेवक व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सुलक्षणा सावंत यांनी पद्मिनी फाउंडेशनतर्फे हाती घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते मतदारसंघातील दहावी व इतर विभागात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

CM Pramod Sawant
Panaji Traffic : पणजीत मांडवी पुलावर ‘ओव्हरटेक’चा थरार!

‘स्वयंपूर्ण युवा व गोवा हे आपले स्वप्न’

विद्यार्थ्यांनी नावीन्याचा ध्यास घेत नवनवीन कौशल्ये विकसित करून स्वतःला कार्यतत्पर केल्यास विविध क्षेत्रात हजारो रोजगार संधी उपलब्ध आहेत.

त्यासाठी युवा पिढीने विशेष रुची दाखवावी. स्वयंपूर्ण युवा व गोवा हे आपले स्वप्न आहे. ते साकारण्यासाठी उपलब्ध साधनांचा पूर्ण उपयोग करून भविष्य घडवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

CM Pramod Sawant
NCP Maharashtra: ‘राष्ट्रवादी’त उभी फूट; शरद पवारांना धक्का देत दादांची युतीसोबत चूल

‘पैशांअभावी कुणाचेही शिक्षण थांबणार नाही’

पद्मिनी फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सर्व घटकांना सहकार्य करण्याची भूमिका बजावताना दर्जेदार शिक्षण व प्रत्येकाला उत्तम आरोग्य लाभावे यासाठी अनेक योजना आहेत.

आरोग्याबाबत ग्रामीण महिला दुर्लक्ष करतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संस्थेतर्फे विविध उपक्रम चालू आहेत. पैशांअभावी कुणाचेही शिक्षण थांबणार नाही, याची खबरदारी सरकारने घेतलेली आहे. अनेक संधी आहेत त्याचा उपयोग करून घेण्यासाठी पुढे यावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com